शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राणा दाम्पत्याला कारागृह की जामिनावर सुटका?, आज फैसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:58 IST

सत्र न्यायालयाने शनिवारी या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ मे पर्यंत राखून ठेवला. 

मुंबई : हनुमान चालीसा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे कारागृहातच राहणार की जामिनावर सुटका होणार, याचा फैसला आज होणार आहे. सत्र न्यायालयाने शनिवारी या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ मे पर्यंत राखून ठेवला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केल्यानंतर राणा दाम्पत्याने तो कार्यक्रम मागेही घेतला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह व दोन गटांत वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.  न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला.

आम्ही राजद्रोहासारखा कोणताही गुन्हा केला नाही. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी कशाला हवी? आम्ही मशिदीबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आम्ही ‘मातोश्री’लाही आव्हान दिले नाही. आम्हाला फक्त मातोश्रीवर जायचे होते, असा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्यावतीने ॲड. आबाद पौडा यांनी न्यायालयात केला.

त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. ‘प्रत्येकाला लोकशाहीवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण त्यास मर्यादा आहे. जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा राजद्रोहाचा आरोप ठेवला जातो. तुम्हाला लोकांबरोबर हनुमान चालीसाचे पठण करायचे होते, तेव्हाच तुम्ही मर्यादा ओलांडली. या देशात बहुसंख्य हिंदू असल्याने ‘हिंदुत्वाचा’ वापर हुकमाच्या एक्क्याप्रमाणे केला जातो. हे सरकार हिंदूंच्या कसे विरोधात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राणा यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली असून मातोश्रीबाहेर प्रक्षोभक वक्तव्य केले, असा युक्तिवाद घरत यांनी केला.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाCourtन्यायालय