शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Navneet Rana in Delhi: आदित्य ठाकरेंनाही असेच तुरुंगात टाकले जाईल, तेव्हाच...; नवनीत राणांचा दिल्लीत संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:23 IST

Navneet Rana statement on Aditya Thackeray arrest: राणा दाम्पत्याची अध्यक्षांकडे तक्रार, बिरला यांची भेट : २३ रोजी हक्कभंग समितीसमोर बाजू मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या ‘अमानवीय’ वागणुकीची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे खासदार नवनीत राणा यांनी केली. या संदर्भात लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर २३ मे रोजी खासदार राणा बाजू मांडणार आहेत.

राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली आरोपी असलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याला अमानवीय वागणूक दिल्याचा आरोप केला. 

कोणताही गुन्हा नसताना आपल्याला १२ दिवस तुरुंगात डांबले. आदित्य ठाकरे यांना अशाच प्रकारे तुरुंगात टाकण्यात येईल, तेव्हाच त्याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होईल, अशा शब्दात खासदार राणा यांनी संताप व्यक्त केला.

लोकसभा अध्यक्षांकडे आपबीती सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणासुद्धा सोबत होते. यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या वागणुकीची आपबीती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना सांगितली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट घेणार आहेत. शहा सध्या आसाम दौऱ्यावर असून, ते मंगळवारी दिल्लीत येत आहेत. यानंतर त्या केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभा