शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 09:11 IST

lok sabha election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज नवनीत राणा (Navneet Rana) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. अमरावतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज नवनीत राणा (Navneet Rana) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. अशात नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी आजचा निकाल अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या निकालाचे वाचन ओपन कोर्टात होणार असून, निकाल वेबसाईटवर अपलोड केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात नवनीत राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. तसेच, उच्च न्यायालयातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

रश्मी बर्वेंच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा आज निकालदुसरीकडे, काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल आज येणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हा निकाल असणार आहे. रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी सुनावणी घेत दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद ऐकून घेत गुरुवारसाठी निकाल राखून ठेवला होता.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाamravati-pcअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४