शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

नवी मुंबई, वसई-विरारची निवडणूक अखेर लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 6:58 AM

अंबरनाथ, बदलापूरच्या प्रशासकांना मुदतवाढ तर कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही,  तोवर तेथील निवडणुका  न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका वाढत्या कोरोना   प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लांबणीवर पडल्या असून तेथील प्रशासकांना मुदतवाढ देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यास रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील बहुचर्चित नवी मुंबई, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ- बदलापूर नगरपालिका आणि मुरबाड, शहापूर नगर पंचायतींची निवडणूक पुढे गेली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही, तोवर तेथील निवडणुका  न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. 

मसुद्यास मान्यताnनिवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांत नियुक्त प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्यात येणार असून, त्यात महापालिका, नगरपालिकांचाही समावेश असेल. त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधेयक सादर करण्यात येणार असून, त्याच्या मसुद्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. nमुदत संपलेल्या व निवडणूक न झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३० एप्रिल २०२१पर्यंत प्रशासकांची नियुक्ती केली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासकांच्या या कार्यकाळात निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता प्रशासकांना मुदतवाढ दिली जाईल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई