शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट, गृह विभागाचा निर्णय, दहशतवादी कारवायांना लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:01 IST

राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

- जमीर काझी मुंबई : राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आठवडाभरात त्याबाबतची कार्यवाही होईल. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० हून अधिक अधिकारी-कर्मचारी असतील.नवी मुंबई व सोलापुरातील स्वतंत्र कक्षामुळे स्थानिक पोलीस तसेच अनुक्रमे ठाणे व पुण्याच्या एटीएसवर पडणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील संशयास्पद व्यक्ती, वस्तंूबाबत तत्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईबरोबरच कोकण व मराठवाडा, सीमाभागात संशयास्पद व्यक्तींचा वावर, हालचाली वाढल्या आहेत. घातपाती कृत्यांची शक्यता पाहता, हा परिसर संवेदनशील बनल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाळत ठेवावी लागत होती. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवरील सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट सुरू केल्यास आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या सीमा भागातील हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सागरी किनारा व औद्योगिक क्षेत्र तसेच उरण, रायगड या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र युनिटची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव एटीएसचे प्रमुख अतुलचंंद्र कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी गृह विभागाला पाठविला होता. त्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक पोलिसांकडून हे मनुष्यबळ या कक्षासाठी वर्ग केले जातील. नवी मुंबईतील स्वतंत्र युनिटमुळे ठाणे एटीएसला मुंब्रा, कळवा, पालघर आदी भागात अधिक लक्ष केंद्रित करून तेथील घातपाती कृत्याला लगाम घालता येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कार्यालयांची संख्या आठमुख्यालयाशिवाय महाराष्ट्र एटीएसची सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, अकोला या ठिकाणी कार्यालये आहेत. आता नवी मुंबई व सोलापूरमुळे कार्यालयांची संख्या आठवर गेली आहे. मुंबई, औरंगाबाद व पुणे शाखेचे कामकाज उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली तर अन्य ठिकाणी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम चालते.

टॅग्स :PoliceपोलिसTerrorismदहशतवाद