शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: भुयार खोदून बँकेवर दरोडा , पाच महिन्यांपासून सुरू होते भुयार खोदण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:35 IST

हिंदी चित्रपटातील रहस्यमय कथेलाही लाजवणारा दरोडा जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर घातल्याचे सोमवारी उघड झाले. बँकेशेजारच्या दुकानातून सुमारे ३० फूट भूयार खोदून थेट लॉकर रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी

नवी मुंबई : हिंदी चित्रपटातील रहस्यमय कथेलाही लाजवणारा दरोडा जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर घातल्याचे सोमवारी उघड झाले. बँकेशेजारच्या दुकानातून सुमारे ३० फूट भूयार खोदून थेट लॉकर रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी २२५ पैकी ३० लॉकर फोडून दागिन्यांसह कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान ऐवजाची लूट केली. बँकेशेजारचे हे दुकान भाड्याने दिलेले असून तेथील सर्व जण फरार झाले आहेत. झारखंडमधील ही टोळी असल्याचा संशय आहे.जुईनगर सेक्टर ११ येथील बँक आॅफ बडोदाची शाखा शनिवार, रविवारच्या दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी सकाळी उघडली. बँकेच्या खातेधारक रूपाली अडागळे या लॉकर वापरण्यासाठी बँकेत आल्या होत्या. या वेळी बँक कर्मचाºयांना सुरुवातीचा काही वेळ लॉकर रूमचा दरवाजा उघडण्यात अडथळा येत होता. त्यानंतर दरवाजा उघडला तेव्हा बँकेच्या लॉकर रूममध्ये मोठा दरोडा पडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत भुयार खोदून बँकेवर दरोडा पडल्याचे दिसून आले.‘भक्ती रेसिडेन्सी’ या इमारतीच्या तळाशी चार गाळ्यांमध्ये बँक आहे. त्यापैकी एक गाळा एटीएमच्या वापरासाठी आहे. त्यापासून तिसºया क्रमांकाच्या गाळ्यामधून हे ३० फूट लांब व तीन फूट रुंदीचे भुयार खोदण्यात आले. लॉकर रूमखाली ते पाच फूट खोल होते. या खोदकामातून निघालेल्या मातीचीदेखील त्यांनी परिसराबाहेर विल्हेवाट लावलेली आहे. ते दुकान शरद कोठावळे यांचे असून गेना प्रसाद नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले होते. पाच महिन्यांपासून त्या ठिकाणी बँकेवर दरोड्यासाठी भुयार खोदण्याचे काम सुरू होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.बँकेत सुमारे २२५ लॉकर असून, त्यापैकी ३0 लॉकर फोडण्यात आले आहेत. दरोड्यात बँक ग्राहकांचा कोट्यवधींचा ऐवज लुटला गेल्याची शक्यता आहे.दरोडेखोरांनी बँकेतील ३० लॉकर फोडले असून, त्यापैकी ८ ते १० ग्राहकांच्या मुद्देमालाची माहिती पोलिसांना मिळू शकलेली आहे. त्यापैकी प्रवीण ठाकूर यांच्या लॉकरमध्ये कुटुंबाचे ३० तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने होते.पाच महिन्यांपासून भुयार खोदण्याचे काम!पाच महिन्यांपासून भुयार खोदण्याचे काम सुरू होते, अशी शक्यता आहे. हे दुकान बंदच असायचे. तेथे एक किंवा दोन तरुण असायचे. भक्ती रेसिडेन्सीमधील रहिवाशांना दुकानातील मालावर कायम मातीची धूळ दिसायची. ही धूळ भुयारातील मातीची असल्याचे उघड झाले आहे.भुयारात टेकू-भुयार खचू नये यासाठी त्यात बांबूचे टेकू लावून त्यावर प्लाय लावले होते. दरोडेखोरांनी पद्धतशीर ‘रेकी’ करून थेट लॉकर रूममध्येच पोहोचणारे भुयार तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले.झारखंडची टोळी?भुयार खोदून अथवा भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्यात झारखंड परिसरातील सराईत टोळ्या सक्रिय आहेत. बडोदा बँकेवरही अशाच टोळीने दरोडा टाकल्याची शक्यता आहे. तपासात महत्त्वाचा धागा ठरतील अशा काही बाबी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानुसार लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.- डॉ. सुधाकर पठारे,परिमंडळ उपआयुक्त

टॅग्स :RobberyदरोडाCrimeगुन्हाNavi Mumbaiनवी मुंबई