शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवसाचा गणपती : लालबागच्या राजाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 09:49 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे.

ठळक मुद्देलालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटले जाते. कारण लालबागच्या राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे. आज लालबागमध्येच नाही तर, देश-विदेशात लालबागच्या राजाचे लाखो भक्त आहेत.

मुंबई, दि. 25 - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे. लालबागच्या राजाची भव्य मुर्ती डोळयात साठवण्याची त्याच्या चरणावर डोक ठेवण्याची भक्तांची इच्छा असते. राजावर श्रध्दा असणारे त्याचे भक्त मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतात. 

लालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटले जाते. कारण लालबागच्या राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे. 1934 साली लालबागमधल्या स्थानिक व्यापा-यांच्या बाजारपेठेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता.  त्यावेळी इथले व्यापारी नवस बोलले होते. श्रीगणेशाच्या आशिर्वादाने त्यांच्या जागेचा प्रश्न मिटला आणि इथे गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आज लालबागमध्येच नाही तर, देश-विदेशात लालबागच्या राजाचे लाखो भक्त असून, राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो. 

लोकमत हाच लालबागच्या राजाचा 83 वर्षांचा प्रवास वेब सीरीजच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. मुर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांची मुलाखत, अभिनेता चैतन्य चंद्रात्रे यांना लालबागच्या राजाच्या आशिर्वादाने आलेले अनुभव तुम्हाला पाहता येतील. 

लोकमत प्रस्तुत या सहाभागांच्या वेबसीरीजमध्ये लालबागच्या राजाचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो, स्मृतिचिन्हे आणि कधीही न ऐकलेले किस्से, अनुभव तुम्हाला पाहता येतील. 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान रोज सकाळी 9 वाजता आणि 4 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता वेब सीरीजचा एक एपिसोड प्रसारीत होईल.  लोकमत. com, लोकमत फेसबुक पेज, लोकमत न्यूज You Tube चॅनलवर तुम्ही ही सीरीज पाहू शकता. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव