शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

खवळलेल्या समुद्राशी नौदलाची झुंज

By admin | Updated: September 19, 2016 06:04 IST

मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील १७ पैकी १४ मच्छीमारांना वाचविण्यात शनिवारी सायंकाळी बचाव पथकांना यश आले.

मुंबई : मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील १७ पैकी १४ मच्छीमारांना वाचविण्यात शनिवारी सायंकाळी बचाव पथकांना यश आले. या बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी समुद्रात उतरलेले नौदलाचे दोन पाणबुडे (डायव्हर्स) दिसेनासे झाल्याने नौदलाच्या चिंतेत भर पडली होती. अखेर रविवारी सकाळी या दोन्ही पाणबुड्यांचा शोध लागला आणि त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, खवळलेला समुद्र, मुसळधार पाऊस, अंधार आणि खराब हवामानाशी या जवानांनी रात्रभर यशस्वी झुंज दिली. मुंबईपासून ३० सागरी मैल अंतरावर शनिवारी सकाळी दत्त साई ही बोट खराब हवामानामुळे बुडाली. याच परिसरात असलेल्या एमव्ही डीपेंडेबल या बोटीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मच्छीमार बोटीवरील १४ मच्छीमारांची सुटका केली. तर, बेपत्ता मच्छीमारांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दल आणि ओएनजीसीच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवली. शोधकार्यादरम्यान शनिवारी सायंकाळी नौदलाच्या आयएनएस त्रिशूलवरील जवानांना समुद्रात एक मच्छीमार वाहून जात असल्याचे आढळले. या मच्छीमाराला वाचविण्यासाठी आयएनएस त्रिशूलवरील बिपीन दहल आणि घनश्याम पाटीदार हे दोन पाणबुडे (डायव्हर्स) समुद्रात उतरले.अपघात आणि खराब हवामानामुळे भेदरलेला मच्छीमार बचावासाठी आलेल्या जवानांपर्यंत पोहचू शकला नाही. अवघ्या तीन मीटरवर असूनही खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारापर्यंत पोहचणे शक्य होत नव्हते. या प्रयत्नात मच्छीमारासह पाणबुडेदेखील समुद्रात दिसेनासे झाले. त्यामुळे बेपत्ता मच्छीमारांसह पाणबुड्यांच्या शोधासाठी दहा बोटी आणि चार हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने बचाव पथकांनी जोरदार मोहीम हाती घेतली. रविवारी सकाळी ६च्या सुमारास शोधपथकांना दोन्ही पाणबुड्यांचा शोध घेण्यात यश आले. प्रतिकूल परिस्थितीतही या दोघा जवानांनी समुद्रात संपूर्ण रात्र काढली. तब्बल बारा तासांहून अधिक काळ या जवानांनी समुद्राशी यशस्वी झुंज तर दिलीच; शिवाय या कालावधीत एकमेकांच्या सहकार्याने बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पाणबुड्यांना मुंबई नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही देशबांधवांच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून नेटाने प्रयत्न करून या जवानांनी नौदलाच्या उच्च परंपरेचा वारसा पुढे चालविल्याबद्दल लुथरा यांनी जवानांचे कौतुक केल्याचे जनसंपर्क अधिकारी कॅप्टन राहुल सिन्हा यांनी सांगितले. >तीन जण बेपत्ताएमव्ही डीपेंडेबल या बोटीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मच्छीमार बोटीवरील १४ मच्छीमारांची सुटका केली. तर, बेपत्ता मच्छीमारांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.