शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले

By admin | Updated: September 9, 2014 05:07 IST

सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप यावेळी मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे चित्र पश्‍चिम वर्‍हाडात दिसून आले

संतोष मुंढे, वाशिम - सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप यावेळी मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे चित्र पश्‍चिम वर्‍हाडात दिसून आले. गत १0 दिवसांमध्ये या भागातील तिन्ही जिल्ह्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून, गणेशोत्सव अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.लोकमान्य टिळकांनी जनजागृती, प्रबोधन करणे, तसेच सामाजिक एकोपा वाढून स्वातंत्र्यलढय़ाची चळवळ घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अस्तित्वात आणली. कालांतराने या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. सार्वजनिक गणेश मंडळं सामाजिक उपक्रमांबरोबरच धार्मिक कार्यक्रमांवर भर देऊ लागले. यावेळीही मंडळांनी तीच परंपरा जोपासली. रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर आदी आरोग्यविषयक उपक्रमांसह काही ठिकाणी समाजातील कुप्रथा, समस्यांबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न गणेश मंडळांनी केले. एड्स आणि स्त्रीभ्रूण हत्येबाबत जनजागृती करण्यात आली. तद्वतच, प्रवचन, कीर्तन, सामूहिक गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आले. वाशिम शहरातील एकूण गणेश मंडळांपैकी ७५ टक्के गणेश मंडळांच्यावतीने सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेण्यात आला. ५ टक्के गणेश मंडळांनी मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले, तर २५ टक्के गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश स्थापना केली. गणेश मंडळांनी अवाजवी खर्चाला यावेळी फाटा दिल्याचे चित्रही दिसून आले. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण ८८१ सार्वजनीक गणेश मंडळांपैकी ८२ टक्के गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले. शिक्षण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान आणि गरजवंतांना मदत करण्यासह, वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेवर भर देण्याचे काम या जिल्ह्यातील मंडळांनी केले. गतीमंद बालकांचे शैक्षणीक पालकत्व स्विकारून बुलडाण्यातील रुद्र गणेश मंडळाने पश्‍चिम वर्‍हाडातील सर्व मंडळांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. अकोला जिल्ह्यातील एकूण १७८४ गणेश मंडळांनी विविध मुद्यांवर फलकं व देखावे सादर करुन जनप्रबोधनाचे काम केले. पश्‍चिम वर्‍हाडात सर्वाधिक ३२४ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्याचा विक्रम अकोला जिल्ह्याने आपल्या नावे केला आहे. १३ तालुक्याच्या बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी ८८१ सार्वजनीक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. या जिल्ह्यातील २९२ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. ६ तालुक्यांच्या वाशिम जिल्ह्यात ६0५ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यामध्ये शहरी भागातील २१९ तर ग्रामीण भागातील ३८६ गणेश मंडळांचा समावेश होता. ७ तालुक्याच्या अकोला जिल्ह्यात १७८४ सार्वजनीक गणेश मंडळानी श्रींची स्थापना केल्याची नोंद आहे. यामध्ये ३२४ गावात एक गाव एक गणपतीची नोंद करण्यात आली. १0 दिवसांच्या या उत्सवात तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. गुण्यागोविंदाने एवढा मोठा उत्सव साजरा करून, पश्‍चिम वर्‍हाडाने सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे.