शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन मेडिकल असोसिएशनचा उद्या राष्ट्रव्यापी बंद; १ लाख १०,००० डॉक्टर्स सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 18:00 IST

सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार

ठळक मुद्देआंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३४ संस्थांचा सक्रिय पाठिंबा

पुणे : आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुध्द इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ११ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या दिवशी सर्व दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६  ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. या वेळेत आय.सी.यु., अपघातग्रस्त रुग्णांसाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा सुरु राहतील. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या २१९ शाखांमधील ४५००० डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण १,१०,००० डॉक्टर्स सहभागी होतील.

मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एम.एस.एन.) या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे महाराष्ट्रातील ३६ सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील १५००० वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे १५००० ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (मार्ड) आणि आय.एम.ए.च्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) तर्फे सक्रिय सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह भारतभरातील ६ लाख आयएमए सदस्य सहभाग घेतील.----------------आयएमएच्या मागण्या

१. सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी.२. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या ४  समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत.३. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा.

 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल