शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त!

By admin | Updated: October 20, 2014 05:05 IST

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.

विजय बाविस्करपश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील ४४ जागांपैकी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला प्रत्येकी केवळ १० जागा मिळाल्या. या तीनही जिल्ह्यांत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपा लाटेचा शिवसेनेलाही मोठा फटका बसला आहे. सहकाराचे जाळे असलेल्या पश्चिम महाराष्ट्राने राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसला नेहमीच साथ दिली. मात्र, या वेळी भाजपाने नियोजनबद्ध प्रचार करून तीनही पक्षांना आस्मान दाखविले. राष्ट्रवादीच्या बंडखोरांनाच स्वत:कडे घेऊन ताकद वाढविण्याची भाजपाची रणनीती होती. मात्र, मोदीलाट इतकी प्रभावी होती की या रणनीतीची आवश्यकता भासली नाही. शहरी भागांत भाजपाने मोठी आघाडी घेतली. पुणे शहरातील आठही जागा भाजपाने जिंकल्या. लक्ष्मण जगताप, राहुल कुल हे राष्ट्रवादीचे तगडे बंडखोर भाजपामध्ये आल्याने त्यांची ताकद वाढली. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव कॉँग्रेसच्या जिव्हारी लागला. श्रीगोंद्यातून माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेले पक्षांतर मतदारांनी झिडकारले. जुन्नरमधील शरद सोनवणे यांचा अनपेक्षित एकमेव विजय हा मनसेची राज्यात लाज राखणारा ठरला. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती निसटत्या मतांनी विजयी झाल्या. पुणे, नगरमध्ये फटका बसताना सोलापूरने मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादीला तारले.