मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री विधानसभेच्या १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक उमेदवारांनी शुक्रवार सकाळपासून उमेदवारी अर्ज भरले. पहिल्या यादीतील दिग्गजांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील, मनोहर नाईक, अनिल देशमुख, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, जयदत्त क्षीरसागर, गणेश नाईक आदींचा समावेश आहे. माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना डच्चू देण्यात आला आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या कन्या भाग्यश्री, माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या सून नमिता असा नेत्यांच्या नातेवाइकांचा गोतावळा यादीमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय दिना पाटील, विजय भांबळे, काँग्रेसचे माजी आमदार ध्रुपतराव सावळे, भाजपाचे माजी आमदार राजकुमार पटेल, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीतून आलेल्या रेखाताई खेडेकर, लोकसभेत पराभूृत झालेले कृष्णराव इंगळे यांच्या कन्या माजी नगराध्यक्ष स्वाती वाकेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र समीर, गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक अशा पिता-पुत्राच्या जोड्याही आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या राज्य अध्यक्ष पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांना मैदानात उतरवले आहे. (विशेष प्रतिनिधी)१) अक्कलकुवा - विजय पराडके२) शहादा - राजेंद्र गावित३) नंदुरबार - विकास वळवी४) नवापूर - शरदकुमार गावित५) साक्री - दिलीप नाईक६) धुळे ग्रामीण - किरण पाटील७) धुळे शहर - राजवर्धन कदमबांडे८) शिंदखेडा - संदीप बेडसे९) शिरपूर - जयवंत पाडवी१0) अमळनेर - कृषीभूषण साहेबराव पाटील११) एरंडोल - डॉॅ.सतीश पाटील१२) चाळीसगाव - राजीव देशमुख१३) पाचोरा - दिलीप वाघ१४) जामनेर - दिगंबर पाटील१५) बुलडाणा - नरेश शेळके१६) चिखली - ध्रुपतराव सावळे१७) सिंदखेडराजा - रेखाताई खेडेकर१८) मेहकर - मंदाकिनी कंकाळ१९) खामगाव - नानाभाऊ कोकरे२0) जळगाव जामोद - स्वाती वाकेकर२१) अकोला पूर्व - शिरीष धोत्रे२२) रिसोड - बाबाराव पाटील (खडसे)२३) मेळघाट - राजकुमार पटेल२४) मोर्शी - हर्षवर्धन देशमुख२५) वर्धा - सुरेश देशमुख२६) काटोल - अनिल देशमुख२७) हिंगणा - रमेश बंग२८) गडचिरोली - भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम२९) अहेरी - धर्मरावबाबा आत्राम३0) ब्रह्मपुरी - संदीप गड्डमवार३१) वणी - संजय देरकर३२) यवतमाळ - संदीप बाजोरिया३३) पुसद - मनोहर नाईक३४) किनवट - प्रदीप जाधव३५) लोहा - शंकर धोंडगे३६) नायगाव - श्रीनिवास देशमुख३७) वसमत - जयप्रकाश दांडेगावकर३८) कळमनुरी - शिवाजीराव माने३९) हिंगोली - दिलीप चव्हाण४0) जिंतूर - विजय भांबळे४१) परभणी - प्रताप देशमुख४२) गंगाखेड - मधुसुदन केंद्रे४३) घनसावंगी - राजेश टोपे४४) बदनापूर - बबलू चौधरी४५) भोकरदन - चंद्रकांत दानवे४६) कन्नड - उदयसिंह राजपूत४७) फुलंब्री - अनुराधा चव्हाण४८) औरंगाबाद मध्य - विनोद पाटील४९) पैठण - संजय वाकचौरे५0) गंगापूर - कृष्णा डोणगावकर५१) वैजापूर - भाऊसाहेब चिकटगावकर५२) गेवराई - बदामराव पंडित५३) माजलगाव - प्रकाश सोळंके५४) बीड - जयदत्त क्षीरसागर५५) आष्टी - सुरेश धस५६) केज - नमिता मुंदडा५७) परळी - धनंजय मुंडे५८) अहमदपूर - बाबासाहेब पाटील५९) उद्गीर - संजय बन्सोडे६0) निलंगा - बसवराज नागराळकर६१) औसा - राजेश्वर बुके६२) उमरगा - संजय गायकवाड६३) उस्मानाबाद - राणा जगजितसिंह पाटील६४) परांडा - राहुल मोटे ६५) नांदगाव - पंकज भुजबळ६६) मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद इस्माईल६७) कळवण - ए.टी.पवार६८) येवला - छगन भुजबळ६९) निफाड - दिलीप बनकर७0) नाशिक पूर्व - देविदास पिंगळे७१) इगतपुरी - हिरामण खोसेकर७२) विक्रमगड - सुनील भुसारा७३) भिवंडी ग्रामीण - महादेव घाटाळ७४) शहापूर - पांडुरंग बरोरा७५) भिवंडी पश्चिम - अब्दुल रशीद ताहीर मोमीन७६) कल्याण पश्चिम - संजय पाटील७७) कल्याण पूर्व - निलेश शिंदे७८) मीरा भार्इंदर - गिल्बर्ट मेन्डोंसा७९) ओवळा-माजीवडा - हनमंत जगदळे८0) ठाणे - निरंजन डावखरे८१) मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड८२) ऐरोली - संदीप नाईक८३) बेलापूर - गणेश नाईक८४) विक्रोळी - संजय दिना पाटील८५) वर्सोवा - नरेंद्र वर्मा८६) अणुशक्ती नगर - नवाब मलिक८७) सायन कोळीवाडा - प्रसाद लाड८८) वरळी - सचिन अहीर८९) कर्जत - सुरेश लाड९0) श्रीवर्धन - अवधूत तटकरे९१) आंबेगाव - दिलीप वळसे पाटील९२) दौंड - रमेश थोरात९३) इंदापूर - दत्ता भरणे९४) बारामती - अजित पवार९५) अकोले - वैभव पिचड९६) संगमनेर - आबासाहेब थोरात९७) श्रीरामपूर - प्रा.सुनीता गायकवाड९८) नेवासा - शंकरराव गडाख पाटील९९) शेवगाव - चंद्रशेखर घुले१00) पारनेर - सुजित झावरे१0१) अहमदनगर शहर - संग्राम जगताप१0२) श्रीगोंदा - राहुल जगताप१0३) करमाळा - रश्मी बागल१0४) माढा - बबन शिंदे१0५) बार्शी - दिलीप सोपल१0६) मोहोळ - रमेश कदम१0७) सोलापूर शहर उत्तर - मनोहर सपाटे१0८) सोलापूर मध्य - विद्या लोलगे१0९) अक्कलकोट - मल्लिकार्जून पाटील११0) सोलापूर दक्षिण - बाळासाहेब शेळके१११) पंढरपूर - चंद्रकांत बागल११२) माळशिरस - हनुमंत डोळस११३) फलटण - दीपक चव्हाण११४) वाई - मकरंद पाटील११५) कोरेगाव - शशिकांत शिंदे११६) कराड उत्तर - श्यामराव पाटील११७) पाटण - सत्यजितसिंह पाटणकर११८) सातारा - छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले११९) दापोली - वसंत कदम१२0) गुहागर - भास्कर जाधव१२१) चिपळूण - शेखर निकम१२२) कुडाळ - पुष्पसेन सावंत१२३) सावंतवाडी - सुरेश दळवी १२४) चंदगड - संध्यादेवी कुपेकर१२५) राधानगरी - के.पी.पाटील१२६) कागल - हसन मुश्रीफ१२७) इस्लामपूर - जयंत पाटील१२८) शिराळा - मानसिंग नाईक१२९) खानापूर - अमरसिंह देशमुख१३0) तासगाव-कवठे महांकाळ - आर.आर.पाटील
राष्ट्रवादीच्या १३१ उमेदवारांची यादी
By admin | Updated: September 27, 2014 05:12 IST