शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध

By admin | Updated: July 5, 2017 03:23 IST

महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणारे प्रमोद साठे हे सराईत गुन्हेगार असून,

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणारे प्रमोद साठे हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ती व्यक्ती खुनातील आरोपी असून, एका अंडरवर्ल्ड डॉन टोळीतील गुंड आहे. स्थायी समितीच्या एका माजी सभापतीने व विद्यमान नगरसेवकाने साठे यांच्याशी संगनमत करून खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. साठे हे राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांचे कुटुंब सांभाळतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड झाले आहे, अशी टीका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली. या आरोपाचा राष्ट्रवादीने इन्कार केला आहे.टक्केवारीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जुंपली आहे. टक्केवारीसाठी भाजपाचे पदाधिकारी बिले अडवीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यास भाजपाने उत्तर दिले आहे. तक्रार देणारी व्यक्ती कोण आहे? याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी महापौर आझम पानसरे, भाजपा सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित होते. आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘महापालिकेतील ठेकेदारांना आतापर्यंत नियमबाह्यपणे बिले दिली जात होती. मात्र, भाजपाने सत्तेत आल्यानंतर यापुढे कायद्यातील तरतुदीनुसारच बिले देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याबाबत ठेकेदारांना कोणतीही अडचण नाही. मात्र, ठेकेदारांच्या आडून नियमबाह्यपणे पैसे कमविण्याचा धंदा चालविलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपा नियमाने वागत आहे, हे रूचलेले नाही. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामांचे पैसे महापालिकेत अडकल्यामुळे ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिले मिळावीत, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.साठे यांनी ठेकेदारांची बिले देण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रारही राष्ट्रवादीच्या दबावाचाच एक भाग आहे. साठे हे ना महापालिकेचा ठेकेदार आहेत ना शहरातीलरहिवासी आहेत. ना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले आहेत. तरीही त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले. साठे हे आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खुनातीलआरोपी असून, त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन टोळीशी संबंध आहे. ’’साठे कोण आहे? काय आहे याबद्दल आम्हाला रस नाही. त्यांनी एक नागरिक म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची चौकशी व्हावी. दोषी नसतील तर सिद्ध करावे. पत्रकार परिषदेस उपस्थित असणाऱ्यांचा भूतकाळ काय आहे, हेही तपासण्याची गरज आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे. राष्ट्रवादीचे जर अंडरवर्ल्डशी संबंध असतील भाजपाचे त्यापुढे जाऊन जगातील गुन्हेगारांशी संबंध आहेत. तुम्ही किती साजूक तुपातले आहेत.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी२००७ मध्ये माझा मोका डिस्चार्ज झाला आहे. कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मी एक व्यावसायिक आहे. मी मूळचा संघाचा आहे. भाजपा काय आहे, हे राष्ट्रवादीतून आलेल्यांनी शिकवू नये. राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाराची परंपरा भाजपातही सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे मी भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती. हे प्रकरण आता वैयक्तिक आरोपांवर आले आहे. भ्रष्टाचार लपविण्यासाठी माझा संबंध राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. भाजपातील नेत्यांवर किती गुन्हे दाखल होते हे सांगितले तर अवघड होईल. - प्रमोद साठे, तक्रारदार फौजदारी दाखल करणारखुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहाची हवा खाऊन आलेल्या राष्ट्रवादीच्या एका माजी स्थायी समिती सभापतीचा जवळचा मित्र आहे. या माजी स्थायी समिती सभापतीला आपल्या प्रभागात बिले नियमाप्रमाणे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे खोटी तक्रार करण्यास भाग पाडले. राष्ट्रवादी आणि अंडरवर्ल्डचे संबंध उघड झाले आहेत. मनमानेल त्या पद्धतीने कामे करून करदात्यांच्या पैशांची लूट करत होते. मात्र, आता त्याला चाप बसली आहे.पक्षाची बदनामी केली म्हणून फौजदारी दाखल करणार आहोत, असेही जगताप यांनी सांगितले.