मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकुन राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. महानगर पालिकेच्या एकूण १४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागा जिकंल्या, तर त्या खालोखाल शिवसेनेने ४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस व भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.नगरपालिकांच्या पोटनिवडणुकीत एकूण १०८ जागांपैकी सर्वाधिक ३१ जागा राष्ट्रवादी पक्षाने जिंकल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत ३ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षाने १९, भाजपाने २६ तर शिवसेनेने २० जागा जिंकल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती बदलत असून खोटी आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेनेला आता जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडत चालला आहे. टोल मुक्त महाराष्ट्र, एलबीटी रद्द करणे, शेतीमालाचे हमीभाव वाढवून देणे या साररख्या जनतेला दिलेल्या आश्वासना पासून आता हे सरकार घुमजाव करीत आहे. त्याचा परिणाम निकालात दिसून आल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादीस पालिका, पोटनिवडणुकीत जास्त जागा
By admin | Updated: January 20, 2015 01:43 IST