शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल पार्कचे रेस्क्यू पथक अवनीच्या बछड्यांना शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 06:56 IST

१३ जणांचा बळी घेणारी पाच वर्षीय वाघीण अवनीला ठार केल्यावर, तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद

मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम अवनी वाघिणीच्या बछड्यांचा शोध घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागात दाखल झाली आहे. १५ नोव्हेंबर रोजी नॅशनल पार्कमधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि कर्मचारी रवाना झाल्याचे उद्यान प्रशासनाने सांगितले.

१३ जणांचा बळी घेणारी पाच वर्षीय वाघीण अवनीला ठार केल्यावर, तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोणीच्या जंगलातील बेस कॅम्पमधून ही शोधमोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत वनविभागाच्या पथकाने सराटी, बोराटी, वरुड आणि भुलगड आदी भागांतील जंगल परिसर पिंजून काढला, परंतु दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाहीत. त्यांना कसे जेरबंद करायचे, हा प्रश्न आता वनविभागासमोर आहे. आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यातून पुन्हा मनुष्यहानी होऊ शकते, अशी शंका प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा हे मध्यंतरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आले होते. मिश्रा यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान इतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमलाही पांढरकवडा येथे बोलावण्यात आले. सध्या बछड्यांचे लोकेशन शोधण्याचे काम हाती घेण्यात आले असून वरिष्ठांच्या आदेशावरून ही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली.‘बछड्यांना बेशुद्ध करणार’अवनीच्या दोन बछड्यांना बेशुद्ध (डार्टिंग) करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या वेळी ते बछडे आढळून येतील, तेव्हा त्यांना बेशुद्ध केले जाईल. तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. १०० किलोमीटर परिघात जंगल पसरले आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणMumbaiमुंबई