शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात परप्रांतिय युवकाचा गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:02 IST

नाशिक : गाडीचा हॉर्न का वाजवितो असे विचारल्याच्या रागातून एका परप्रांतिय युवकाने गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित नंदन जयस्वाल (रा़श्रमिकनगर, सातपूर, मूळ राहणार आझमगढ, उत्तर प्रदेश) विरोधात गुन्हा दाखल केला असून गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे़

ठळक मुद्देहॉर्न वाजविल्याचे कारण : गोळीबार करणारा युवक फरारसातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : गाडीचा हॉर्न का वाजवितो असे विचारल्याच्या रागातून एका परप्रांतिय युवकाने गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित नंदन जयस्वाल (रा़श्रमिकनगर, सातपूर, मूळ राहणार आझमगढ, उत्तर प्रदेश) विरोधात गुन्हा दाखल केला असून गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे़

संशयित नंदन जयस्वाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्रमिकनगरमधील सात माऊली चौकात संशयित नंदन जयस्वाल याने गाडीचा हॉर्न वाजविला़ या हॉर्नमुळे त्रस्त झालेल्या वाल्मिकी नामक व्यक्तीने जयस्वाल यास हॉर्न वाजवू नको तसेच कायम गाडीचा हॉर्न वाजवून त्रास का देतो अशी विचारणा केली़ याचा राग येऊन जयस्वाल हा घरात गेला व घरातील गावठी कट्टा बाहेर आणत हवेत गोळीबार केला व फरार झाला़ या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीसांना देताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्यासह सातपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी सात माऊली चौकात पोहोचले होते़

सातपूर पोलिसांनी संशयित जयस्वालच्या घरातून गावठी कट्टा जप्त केला असून फरार झालेल्या जयस्वालच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे़ वाल्मिकी व नंदन यांच्यात पुर्वीपासून काही वाद आहेत का याचा शोध संशयिताचे वडील व नातेवाईकांकडून घेण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित जयस्वालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कट्टयाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू

संशयित नंदन जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी आहे़ त्याचे कायम मूळ गावी जाणे-येणे असल्याने त्याने तेथून हा गावठी कट्टा आणला असावा असा प्राथमिक अंदाज आहे़ संशयित सापडल्यानंतर त्याने हा गावठी कट्टा नेमका कोठून व केव्हा आणला याबाबत माहिती मिळणार आहे़- श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उप आयुक्त, नाशिक़

टॅग्स :NashikनाशिकFiringगोळीबार