शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा

By संजय पाठक | Updated: August 19, 2023 15:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर अजित पवार आणि छगन भुजबळ गटाने ताबा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधावी लागली आहे.

नाशिक - शिवसेनेत जे वर्षभरापूर्वी राजकारण सुरु झाले ते आता राष्ट्रवादीत होत आहे. राज्यभरात अजित पवार आणि शरद पवार गटांमध्ये राष्ट्रवादीची कार्यालये ताब्यात घेण्याची चढाओढ सुरु आहे. मुंबईत राष्ट्रवादीने दोन कार्यालये थाटली आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर अजित पवार गटाने ताबा मिळविला आहे, तर अनेक ठिकाणी शरद पवार गटाने. आता हाच वाद नाशिकमध्ये देखील दिसला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर अजित पवार आणि छगन भुजबळ गटाने ताबा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधावी लागली आहे. नाशिक शहरातच मुंबई नाका येथील किनारा हॉटेल जवळील एका मोकळ्या जागेत अस्थायी स्वरूपात शरद पवार गटाने तंबूत कार्यालय थाटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट सत्तेत भाजपासोबत सामील झाल्यानंतर मुंबई नाका येथील  मुख्य कार्यालय ताब्यात घेण्यावरून काहीसा संघर्ष झाला होता. दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी केली होती. मुंबई नाका येथे प्रशस्त जागेत बांधलेले अद्ययावत कार्यालय हे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले होते. त्यामुळे भुजबळ गटाने त्याचा ताबा सोडला नाहीय. तर शरद पवार गटाकडे दुसरा पर्याय उरलेला नाहीय.

परिणामी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयच उरलेले नाही. या गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी मुंबई नाका येथीलच आपल्या हॉटेल छानमध्ये काही बैठका घेतल्या. मात्र, पक्ष कार्यालय नसल्यामुळे आणि स्वातंत्र्यदिनी हॉटेलमध्ये ध्वजारोहण करण्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने त्यांनी पर्याय जागेचा शोध घेतला. आता मुंबई नाका येथेच तंबूमध्ये नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच पक्षाच्यावतीने चांगले कार्यालय उभे उभारण्यात येईल, असे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळ