शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘सीम स्वाइप’ने लाखोंचा गंडा घालणाऱ्या मुंबईतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:59 IST

नाशिक : ‘सीम स्वाइप’ पद्धतीचा वापर करून शासकीय ठेकेदाराच्या बँकेतील चालू खात्यातील ३७ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करणाºया मुंबईतील दोघा संशयितांना नाशिकच्या सायबर शाखेने अटक केली आहे़ दिवाक रमाकांत राय (२९, रा़ रुम नंबर १०३, कृष्णाई अपार्टमेंट, साबे रोड, दिवा (ईस्ट) ठाणे) व हबीब अझिझ चौधरी (३३, फ्लॅट नंबर १३०१, ट्रायसिटी एन्क्लेव्ह, सेक्टर ९, उलवे, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे़

ठळक मुद्देसायबर शाखेची कामगिरी शासकीय ठेकेदाराची ३७ लाखांची फसवणूक

नाशिक : ‘सीम स्वाइप’ पद्धतीचा वापर करून शासकीय ठेकेदाराच्या बँकेतील चालू खात्यातील ३७ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करणाºया मुंबईतील दोघा संशयितांना नाशिकच्या सायबर शाखेने अटक केली आहे़ दिवाक रमाकांत राय (२९, रा़ रुम नंबर १०३, कृष्णाई अपार्टमेंट, साबे रोड, दिवा (ईस्ट) ठाणे) व हबीब अझिझ चौधरी (३३, फ्लॅट नंबर १३०१, ट्रायसिटी एन्क्लेव्ह, सेक्टर ९, उलवे, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे़

जेलरोड पंचक येथील शासकीय ठेकेदार सतीश उत्तमराव पाटील यांचे बँक आॅफ बडोदातील चालू खाते हॅक करून या खात्यातील ३७ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करून संशयितांनी त्यांची आॅनलाइन फसवणूक केल्याची घटना २४ आॅगस्ट २०१७ रोजी घडली होती़ याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ सायबर शाखेने केलेल्या या तपासात निष्पन्न झालेल्या संशयित दिवाकर राय यास ३१ जुलै रोजी अटक केली़ त्याच्याकडील तपासामध्ये तो अक्रम नावाच्या इसमास वेगवेगळ्या इसमांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत असलेले अकाउंट वापरण्यात देत असल्याचे समोर आले़ या अकाउंटमध्ये अक्रम पैसे ट्रान्सफर करीत असे त्यानंतर दिवाकर राय खात्यातून पैसे काढून अक्रम यास देत असे़

दिवाकर राय यास संशयित अक्रमबाबत कोणतीही माहिती नव्हती़ दि. २ आॅगस्ट रोजी अक्रम हा पत्नीसोबत विमानाने केरळला जात असल्याचे तसेच त्याच्या पत्नीचे नावाबाबत त्रोटक माहिती मिळाली़ या माहितीवरून सायबरचे पोलीस कर्मचारी किरण जाधव, राहुल जगझाप, योगेश राऊत, मंगेश काकुळदे यांनी प्रत्येक बँकेत जाऊन या महिलेच्या नावाचे खाते आहे का याची तपासणी केली असता एका बँकेत हे खाते असल्याचे समोर आले़ त्यानुसार दि. २ आॅगस्ट २०१८ रोजी कोणत्या विमानाने केरळमधील कोणत्या शहरात बुकिंग करण्यात आले त्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस शिपाई श्यामल जोशी यांनी एअरलाइन्स कंपन्यांना फोन करून या नावाने बुकिंग आहे का याची चौकशी केली़ त्यांना गो एअर या एअरलाइन्सने ही महिला केरळमधील कोची येथे जात असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार छत्रपती शिवाजी विमानतळावरून पोलीसमित्र श्रीराम निकम यांच्या मदतीने ताब्यात घेतले़

सायबर पोलिसांनी हबीब चौधरी यास अटक केली असून, त्याच्याकडून चार आयफोन जप्त करण्यात आले आहे़ त्यास न्यायालयात हजर केले असता ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवराज बोरसे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़

सीम स्वाइप पद्धतीने चोरट्यांनी अशी केली रक्कम ट्रान्सफरसतीश पाटील यांचे बँकेतील खाते संशयितांनी प्रथम हॅक केले, त्यानंतर बँकेतील खात्यासोबत जोडलेला आयडिया कंपनीचा मोबाइल क्रमांक मिळविला़ यानंतर आयडिया कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून फोन हरविल्याची खोटी तक्रार करून पाटील यांचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे त्यांच्याच नावे असलेला आयडिचा कंपनीचा मोबाइल क्रमांक प्राप्त केला़ यानंतर पाटील यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करताना पाटील यांच्या क्रमांकाच्या सीमकार्डचा वापर करून त्यावर आलेल्या ओटीपीचा वापर करून बँक आॅफ बडोदाच्या खात्यातून ३७ लाख रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर केली़

टॅग्स :NashikनाशिकonlineऑनलाइनfraudधोकेबाजीArrestअटक