शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

निफाडच्या लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 7:47 PM

नाशिक : निफाड न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणारा निफाड पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर सुकदेव गांगुर्डे (५७) यास सोमवारी (दि़३०) नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी ...

ठळक मुद्देन्यायालयाचे अटक वॉरंटअटक न करण्यासाठी स्वीकारले पैसे निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : निफाड न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणारा निफाड पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर सुकदेव गांगुर्डे (५७) यास सोमवारी (दि़३०) नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड न्यायालयात ४३ वर्षीय तक्रारदाराविरोधात खटला सुरू आहे़ या खटल्यात न्यायालयाने तक्रारदाराविरोधात अटक वॉरंट काढले आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारास अटक न करणे तसेच न्यायालयीन खटल्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी बाराशे रुपयांची मागणी केली होती़ याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली होती़ त्यानुसार सोमवारी निफाडमध्ये सापळा लावण्यात आल्यानंतर निफाड बसस्थानकात तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताच गांगुर्डे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्यासाठी कोणी खासगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा टोल फ्री क्रमांक १०६५ वर संपर्क करण्याचे आवाहन अधीक्षक पंजाबराव उगले यांनी केले आहे़