शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 20:59 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७८ मते वैध ठरली़ तर बाद मतांची संख्या एक हजार ३४१ तर १०३ मतदारांनी नोटाचा वापर केला़ दरम्यान, विजयासाठी ठरविण्यात आलेल्या प्रथम पसंतीच्या मतांचा २३९९० चा कोटा पुर्ण न झाल्याने इलेमेशन राउंडला सुरूवात करण्यात आली़

ठळक मुद्दे मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावरविजयासाठीचा कोटा पुर्ण न झाल्याने इलेमेशन राउंडला सुरूवात

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत. मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७८ मते वैध ठरली़ बाद मतांची संख्या एक हजार ३४१ असून १०३ मतदारांनी नोटाचा वापर केला़ दरम्यान, विजयासाठी ठरविण्यात आलेल्या प्रथम पसंतीच्या मतांचा २३९९० चा कोटा पुर्ण न झाल्याने इलेमेशन राउंडला सुरूवात करण्यात आली़

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असलेली मते याची खातर जमा करण्यात आली. त्यासाठी २० टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर एक मतपेटी अशाप्रकारे एका फेरीत २० मतपेट्यातील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राजाराम माने, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी व अधिका-यांची नेमणूक करण्यात आली होती.

दुपारी बारा वाजेपर्यंत मतपेट्यातील मतपत्रिकेची खात्री करीत असताना, मोजलेल्या मतपत्रिका एका हौदात टाकून एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकी २५ या प्रमाणे मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात येऊन, त्यातुन वैध, अवैध व संशयित मतपत्रिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४७हजार ९७८ मते वैध ठरली. एकूण वैध मतदानाच्या निम्मे व अधिकचे एक अशा प्रकारे विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या फेरीत २३ हजार ९९० मतांचा कोटा ठरवून देण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात करण्यात आली.

या निवडणुकीच्या मतमोजणीविषयी मतदार, व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असल्याने सकाळी ११ वाजेनंतर निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मतमोजणी केद्रांतदेखील सकाळी सात वाजे पासून उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी हजर झाले होते. परंतु मतमोजणीच्या किचकट पद्धतीमुळे काही तासातच उमेदवार व प्रतिनिधींचा उत्साह कमी होत गेला. तर दुसरीकडे मतमोजणी अधिकारी व कर्मचा-यांनी मतमोजणी प्रकिया पुढे वेगाने सुरू केली.उमेदवारांना मिळालेली प्रथम पसंतीची मते* किशोर दराडे - शिवसेना - १६,८८६,* संदीप बेडसे- मित्रपक्ष - १०,९७०,* अनिकेत पाटील - भाजप - ६,३२९,* भाऊसाहेब कचरे - अपक्ष - ५,१६७,* शालिग्राम भिरोड - अपक्ष - ३,८७६,* अमृतराव शिंदे - अपक्ष - ३, २०९़

 

टॅग्स :NashikनाशिकMLAआमदारElectionनिवडणूक