शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 5:15 PM

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला क्रूरपणे मारहाण करून ठार मारणारा आरोपी पती गोविंद बाबूराव प्रधान (रा़ वांगणी शिवार, ता़ पेठे, जि़ नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़५) जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़

ठळक मुद्देपेठ तालुका : वांगणी येथील घटना ; पत्नीला क्रूरपणे मारहाण

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला क्रूरपणे मारहाण करून ठार मारणारा आरोपी पती गोविंद बाबूराव प्रधान (रा़ वांगणी शिवार, ता़ पेठे, जि़ नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़५) जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ ६ जून २०१६ रोजी वांगणी शिवारात ही घटना घडली होती़ पेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी न्यायालयात बारा साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात आरोपी गोविंद प्रधान हा पत्नी वनिता व दहा वर्षीय मुलगी मनीषासह राहत होता़ पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाºया गोविंद प्रधान याने ६ जून २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वांगणी शिवारातील झोपडीत पत्नी वनिता हीस तू सतत कोणाकडेही का बघते असे म्हणून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी पत्नी वनिता ही मला मारू नका अशी, तर दहा वर्षांची मुलगी मनीषा हीदेखील वडिलांना आईला मारू नका विनवणी करीत होती़ मात्र मुलीला ढकलून देत आरोपी गोविंदने मारहाण सुरूच ठेवल्याने पत्नी वनिता हिचा जागीच मृत्यू झाला़मुलगी मनीषा हिने ही घटना गावातील पार्वताबाई भडांगे व हिराबाई हिरकूड या महिलेस ही घटना सांगितली़ यानंतर नागरिक जमा झाले व त्यांनी आरोपी गोविंद प्रधान यास पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मयत वनिताचा भाऊ हिरामण बठाले याने पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ प्रधान न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात अ‍ॅड़ कडवे यांनी बारा साक्षीदार तपासले़

लहान मुलीच्या साक्षीने वडिलांना शिक्षाया खटल्यात सरकारी वकील कडवे यांनी तब्बल बारा साक्षीदार तपासले असले तरी सर्वांत महत्त्वाची साक्ष ठरली ती अल्पवयीन मुलगी मनीषा हिची़ घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मनीषा हिने न्यायालयात वडिलांनी आईला किती क्रूर मारहाण केली याचे सविस्तर वर्णन केले होते़

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाCourtन्यायालय