शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक नरबळी प्रकरणातील अकरा आरोपींना आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:59 IST

नाशिक : भुताळीण आहेस या कारणास्तव दोन सख्ख्या बहिणींना लाथांनी तुडवून मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील अकरा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ आरोपींमध्ये मयत महिलेच्या दोन मुलांचा समावेश असून, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये राज्यातील पहिलीच शिक्षा इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष ; लाथांनी तुडवून केले ठार

नाशिक : भुताळीण आहेस या कारणास्तव दोन सख्ख्या बहिणींना लाथांनी तुडवून मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील अकरा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ आरोपींमध्ये मयत महिलेच्या दोन मुलांचा समावेश असून, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा- २०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे़नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील रहिवासी बुगीबाई पुनाजी दोरे (टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) व तिची बहीण काशीबाई भिका वीर (मोखाडा) यांची आॅक्टोबर २०१४ मध्ये भुताळीण आहे या कारणास्तव अकरा संशयितांनी लाथांनी तुडवून ठार केले होते़ विशेष म्हणजे यानंतर या दोघींचे मृतदेह डहाळेवाडी येथील एका शेतात पुरण्यात आले होते़ या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी न्यायालयासमोर आलेल्या पुुराव्यानुसार आरोपी बच्चीबाई खडके, बुग्गी वीर, लक्ष्मण निरगुडे, नारायण खडके, वामन निरगुडे, किसन निरगुडे, गोविंद मोरे, काशीनाथ दोरे, महादू वीर, हरी निरगुडे, सनीबाई निरगुडे (रा़ टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) या अकरा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अ‍ॅड़ पौर्णिमा नाईक व दीपशिखा भिडे यांनी या खटल्यात काम पाहिले तर तत्कालीन उपविभागीय अधिकारी सी़ एस़ देवराज यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय