शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नाशिकचा किसन तडवी, ताई बामणेला अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 21:25 IST

नाशिक : विजयवाडा येथे सुरू असलेल्या ज्युनिअर नॅशनल अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी आणि ताई बामणे यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावून महाराष्टच्या खात्यात आणखी पदकांची भर घातली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णजिंकून किसनने महाराष्टच्या पदकाचे खाते उघडले होते. किसनने या स्पर्धेत वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकाविले आहे.

ठळक मुद्देविजयवाडा : ज्युनिअर नॅशनल अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा नाशिकच्या धावपटूंची चमकदार कामगिरी

नाशिक : विजयवाडा येथे सुरू असलेल्या ज्युनिअर नॅशनल अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी आणि ताई बामणे यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावून महाराष्टच्या खात्यात आणखी पदकांची भर घातली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णजिंकून किसनने महाराष्टच्या पदकाचे खाते उघडले होते. किसनने या स्पर्धेत वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकाविले आहे.

विजयवाडा येथे सुरू असलेल्या राष्टय पातळीवरील ज्युनिअर अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाराष्टच्या चमूत नाशिकच्या सहा खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे महाराष्टला आणखी काही पदके मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी किसन तडवीने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्टला सुवर्णपदक मिळवून देत पदकांचे खाते उघडले होते. या स्पर्धेत त्याने दावेदार असलेल्या उत्तरप्रदेशच्या खेळाडूंना मागे टाकत विजय मिळविला होता. तर ताई बामणे देखील फार्मात असल्याने आपल्या गटात तीही पदक मिळवून देईल असा विश्वास तिचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार ताईने देखील सुवर्ण कामगिरी केली.१०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किसनने ३०:४१:५७ वेळेची नोंद करीत सुवर्णपदक मिळविले. त्याने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या खेळाडूंना मागे टाकत मोठ्या फरकाने सुवर्णपदक पटाकाविलेतर ८०० मीटरमध्ये ताई बामणे हिने २:१३:६२ मिनिटांची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले. ताई देखील केरळच्या धावपटूंशी स्पर्धा करीत सहज सुवर्णपदकावर नाव कोरले. या दोघांच्या कामगिरीमुळे महाराष्टच्या पदतालिकेत पदकांची भर पडली आहे.