शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 04:13 IST

कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला.

मुंबई : कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला.उत्तर प्रदेशातील गोदामातून शस्त्रसाठा चोरी करून मुंबईकडे परतत असताना, मास्टरमाइंड बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याने कफसीरपच्या ५० बॉटल्समधील सीरप घेतले होते. याच नशेत त्याने पेट्रोलपंपावर पैसे मागणाºया कर्मचाºयाच्या डोक्यावर बंदूक रोखली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आणखी १०० कफसीरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून समजते.शिवडीच्या क्रॉस रोड परिसरात राहणारा पाशा आणि त्याच्या कुटुंबीयांची त्या परिसरात दहशत आहे. वयाच्या २७व्या वर्षीच त्याच्यावर हत्या, दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, अशा स्वरूपाचे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्रांसह फेसबुक, सोशल मीडियावर व्हायरल फोटो अपलोड करण्याचे प्रतापही त्याने केले आहेत. कफसीरप आणि झोपेच्या गोळ्यांच्या व्यसनामुळे तो काय करतो, याचे त्याला भानही नसावे.शस्त्रसाठा चोरी दरम्यानही पाशाने ५० बॉटल्समधील कफसीरप घेतले होते. नाशिक पोलिसांनी त्याला शस्त्रांसह अटक केल्यानंतर, त्याच्याकडून आणखी १०० कफसीरपच्या बॉटल्स जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पेट्रोल पंपावर त्याच्याकडे पैशांची मागणी करताच, बादशहाकडून पैसे घेण्याची हिंमत कोणी केली, असा जाब विचारत, त्याने तेथील कर्मचाºयाच्या डोक्यावर बंदूक रोखली आणि ही बाब पोलिसांना समजताच नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आॅगस्ट महिन्यातच जयपूर कारागृहातून तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर, त्याने हा शस्त्रचोरीचा कट रचला. उत्तर प्रदेशातील शस्त्रचोरीनंतर त्याने सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचा कट आखला होता, अशी माहिती तपासात समोर येत आहे. मात्र, नाशिक पोलिसांमुळे हा डाव फसला.मुलाचाही सहभाग -पाशाचे वडील अकबर पाशा उर्फ बादशाह याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याला १९९५ मध्ये पहिली अटक झाली. त्यांना शस्त्रसाठ्याच्याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. २०१२ मध्येही मुलासोबत शस्त्रांची तस्करी केल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. दोघांचेही पाकिस्तानशी जवळचे नाते आहे. पाशाही पाकिस्तानात दोन ते तीन वेळा गेला होता. त्यामुळे एटीएसकडून यामागे दहशतवादाचे काही कनेक्शन आहे का, या दिशेनेही अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Nashikनाशिक