शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाशिक मुस्लीम मोर्चा : ‘शरियत’मध्ये महिला सुरक्षित; प्रवचन सभेत महिला धर्मगुरूंचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:15 IST

निमित्त होते, तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे धर्मग्रंथ कुराणचा शरियतला भक्कम असा आधार

नाशिक : इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सर्वांगीण विचार करून तयार केली आहे. धर्मग्रंथ कुराणचा या शरियतला भक्कम असा आधार आहे. त्यामुळे महिलांसह सर्व मानवजातीचे हक्क शरियतमध्ये सुरक्षित आहे, असा सूर ईदगाह मैदानावरील प्रवचन सभेतून उमटला.निमित्त होते, तिहेरी तलाक विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत मुस्लीम महिला धर्मगुरू आलेमा सादेका, आलेमा निलोफर, आलेमा फरहत यांनी प्रवचनाद्वारे उपस्थित हजारो महिलांच्या जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘तलाक संकल्पना अन् इस्लाम’, ‘इस्लामी शरियत आणि महिला हक्क’ या विषयावर प्रवचनातून प्रकाश टाकला. याप्रसंगी आलेमा निलोफर म्हणाल्या, इस्लामी शरियत ही महिलांसह संपूर्ण मानवजातीच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करते. शरियत ही धर्मग्रंथ कुराणच्या आधारे मुहम्मद पैगंबरांनी रचली आहे. त्यामुळे या शरियतमध्ये कोणालाही कसल्याहीप्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार मुळीच नाही. तलाक संकल्पना धर्माने अत्यंत व्यापक पद्धतीने मांडली आहे. तिहेरी तलाक किंवा तलाक या संकल्पनेला शरियतनेदेखील नापसंत ठरविले आहे. तलाक होऊ नये, याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला जावा, असे शरियत म्हणते; मात्र ज्यावेळी कुठलाही पर्याय व तडजोडअंती केलेले प्रयत्न फोल ठरले त्यावेळी तलाकचा पर्याय वापरावा. आलेमा सादेका यांनीही तिहेरी तलाक संकल्पना व्यापक पद्धतीने विशद केली. त्या म्हणाल्या, ‘तिहेरी तलाक’ हा मीडियामार्फत सरकार व काही इस्लामविरोधी संघटनांनी चुकीच्या पद्धतीने जनसामान्यांमध्ये पोहचविला. त्यामुळे तिहेरी तलाक हा महिलांवर अन्यायकारकच आहे, असा गैरसमज झाला. मुळात तिहेरी तलाक संकल्पना ही अत्यंत टोकाची असून, एकदा तरी ‘तलाक’ म्हटले तरी तलाक शरियतमध्ये होतो, असे त्या म्हणाल्या.ईदगाह मैदान हाऊसफुल्लशहरात प्रथमच मोठ्या संख्येने मुस्लीम महिला मोर्चाद्वारे रस्त्यावर उतरल्याचे चित्र शनिवारी दुपारी पहावयास मिळाले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ईदगाह मैदान बुरखाधारी महिलांनी हाऊसफुल्ल झाले होते. महिला धर्मगुरूं चे प्रवचन सुरू असताना महिला शांतपणे रणरणत्या उन्हात बसून होत्या. मैदानावर पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती. केवळ सेवेकरी पुरुषांनाच मैदानात प्रवेश दिला जात होता.

टॅग्स :Muslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चाNashikनाशिकtriple talaqतिहेरी तलाकIslamइस्लाम