शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा नरेंद्र मोदींनी स्वतः पांढरा केला, राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:23 IST

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.

परभणी, दि. 8 - मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.शेतीमालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकरी उभारी घेऊ शकत नाही. काँग्रेस सरकारने शेतक-यांना 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. परंतु भाजपा सरकार फक्त 50 उद्योगपतींसाठी काम करतेय. काँग्रेस पक्षाने दबाव टाकला म्हणून भाजप सरकारने कर्जमाफी केली. ही कर्जमाफी RSS भाजपावाली कर्जमाफी आहे.मार्केटिंग 35 हजार कोटींची केली, मात्र कर्जमाफी फक्त पाच हजार कोटींची दिली. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केली नाही, काही निवडक शेतक-यांची कर्जमाफी केल्याचाही घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. गेल्या काही तासांपूर्वीसुद्धा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. नॅनो प्रकल्पासाठी मोदी पैसे देतात, पण शेतकऱ्यांना एक रुपया पण देत नाहीत असे राहुल म्हणाले. नांदेडच्या मोंढा मैदानावर राहुल गांधींची जाहीर सभा चालू आहे. राहुल गांधी आज मराठावाडा दौ-यावर आहेत. 

मागच्या तीन वर्षात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असे राहुल म्हणाले. काँग्रेसच्या दबावामुळेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भाजपा सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले. काळ्या पैशाविरोधातील नरेंद्र मोदींची  मोहीम फेल ठरली आहे. देशाच्या नुकसानीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहे. 2 कोटी युवकांचा रोजगार कुठे गेला ? केवळ स्वप्न दाखवून चालणार नाही त्यांचे भविष्य दाखवा, तीन वर्षांपासून किती युवकांना रोजगार दिला ? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.