शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशावरुन अफवांना उधाण

By admin | Updated: April 15, 2017 19:28 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश तूर्तास होल्डवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश तूर्तास होल्डवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांची अहमदाबाद येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आल्यानं राणेंचा भाजपा प्रवेश होल्डवर ठेवण्यात आल्याची बातमी "एबीपी माझा"ने दिली आहे. 
 
तर दुसरीकडे, नारायण राणे 16 एप्रिलला ओडिशा येथे सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या समारोपादिवशी भाजपाप्रवेश करणार आहेत, असे वृत्त "मुंबई लाइव्ह"नं दिले आहे.   
 
भाजपाच्या ओडिशात सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप 16 एप्रिलला होणार आहे. समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नारायण राणे आपल्या दोन्ही पुत्रांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचंही "मुंबई लाइव्ह"नं म्हटले आहे. 
 
 
दरम्यान, 12 एप्रिलरोजी नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांची अहमदाबादेत भेट झाल्याची वृत्त समोर आले होते. मात्र ही बाब नारायण राणेंनी फेटाळली. "मी  माझ्या खासगी कामासाठी अहमदाबादला गेलो होतो. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतलीच नाही", असे स्पष्टीकरण त्यांनी 13 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले होते.  
 
बुधवारी (12 एप्रिल) रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे स्कॉर्पिओ गाडीतून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी एकत्र दाखल झाले, असे वृत्त एबीपी माझाने दिले होते. पण नारायण राणे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचे फेटाळून लावले आहे. 
 
टीव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या दृश्यांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जे फुटेज आहे त्यामध्ये गाडीचा क्रमांक किंवा अमित शाहांच्या शेजारी बसल्याचा कुठला फोटो आहे का ? असा सवाल त्यांनी केला.  मी दोनवेळा मुख्यमंत्र्यांसोबत विमानातून प्रवास केला पण त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  
 
मी माझ्या रुग्णालयाच्या कामासंदर्भात अहमदाबादला गेलो होतो, असे नारायण राणे यांनी सांगितले. मी संघर्ष यात्रेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सहभागी झालो. त्यामुळे काँग्रेसमधूनच माझ्या पक्षबदलाच्या चर्चा पसरवण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते. दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली पण माझ्या तक्रारीचे निवारण झाले नाही. असे नारायण राणे यांनी सांगितले. 
 
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त येत आहे. त्यातच योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित असल्याने राणेंच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळालं होते.
 
ती अफवाच - नारायण राणे
गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांना 13 एप्रिल रोजी पूर्णविराम देत नारायण राणेंनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले होते. काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलंल जाते आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.