शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 16:16 IST

नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यपालांना भेटून केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईः नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यपालांना भेटून केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा राणेंवर शरसंधान साधलं आहे. कोणी राज्यापालांना भेटलं म्हणून काय राष्ट्रपती राजवट लागू होते काय?, भाजपा असंतुष्ट असून, त्यांना सत्तेची लालसा आहे. त्यामुळे ते राज्यपालांना भेटत असतात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे अस्वस्थ आहेत. भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, अशी त्यांना आशा आहे.  ती अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही. तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी असल्याचं टीकास्त्र बाळासाहेब थोरातांनी सोडलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र काम करतेय, चांगलं काम करतेय आणि पुढेही एकत्र काम करत राहणार आहोत. कोरोनाचं संकट आहे, त्या संकटाविरुद्ध आम्ही लढत आहोत. एकत्र पद्धतीनं लढतो आहोत. कोरोनाच्याविरोधात आम्ही काम करतोय, यात भेटीगाठी चालणार आहेत. आम्ही सतत संपर्कात सुद्धा आहोत. दिवसभरात अनेक वेळा आमचा फोनवरून संपर्क असतो.तिन्ही पक्षांचे नेते, मंत्री हे कोरोना कसा रोखता येईल, हे बघत आहेत. पवारसाहेब आमच्या आघाडीचे नेते आहेत. ते भेट घेऊ शकतात, त्यामागे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमचं सरकार स्थिर आहे, फक्त वातावरण निर्माण केलं जातं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. विरोधी पक्षाने आमचं चुकत असेल तर दाखवून द्यावं, राजकारण करू नये, कोरोना संपला की राजकारण करू. त्यासाठी भरपूर वेळ आहे. पण राष्ट्रपती राजवट हा मुद्दा पुढे आणू नये, आता आम्हाला काम करू द्या, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

हेही वाचा

CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात