नारायण राणेंची मनधरणी नाही!

By Admin | Published: August 5, 2014 04:00 AM2014-08-05T04:00:58+5:302014-08-05T04:00:58+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी, तो परत घेण्याबाबत त्यांची मनधरणी न करण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला.

Narayan Rane is not complaining! | नारायण राणेंची मनधरणी नाही!

नारायण राणेंची मनधरणी नाही!

googlenewsNext
काँग्रेसची भूमिका : ‘वेट अॅण्ड वॉच’
यदु जोशी - मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी, तो परत घेण्याबाबत त्यांची मनधरणी न करण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला असून तसा निरोप काँग्रेस श्रेष्ठींकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 
बंडखोरांपुढे न झुकण्याची काँग्रेसने भूमिका घेतल्याने राणो आता मंगळवारी नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. राणो मंगळवारी पत्रपरिषद घेऊन पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांनी पत्रपरिषद घेऊ नये अथवा मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मागे घ्यावा, यासाठीही काँग्रेसकडून कोणतेही प्रय} केले जाणार नाहीत, असे सुत्रंनी सांगितले. राणो यांच्या दबावापुढे झुकला तर अन्य राज्यातही नाराज नेते डोके वर काढतील. त्यापेक्षा तसे न केलेलेच बरे, असा पक्षामध्ये सूर आहे. 
 
आधी त्यांची भूमिका
राणो यांची काल कोल्हापुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली,  पण आमची एकमेकांशी चर्चा झाली नाही. आता ते उद्या पत्र परिषद घेऊन काही भूमिका जाहीर करणार आहेत. ते काय भूमिका घेतात ते बघून मग त्यांच्याबाबत आम्ही निर्णय घेऊ! 
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
 
मोहन प्रकाश इस्पितळात
अ.भा.काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश हे राणो यांच्याशी मंगळवारी चर्चा करणार अशी चर्चा होती. पण, मोहन प्रकाश यांच्या पायाला फ्रॅर झाल्याने ते मुंबईतील एका इस्पितळात दाखल झाले आहेत.

 

Web Title: Narayan Rane is not complaining!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.