शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: राणेंच्या अटकेनंतर राज्यात हाय अलर्ट; कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:46 IST

Narayan Rane arrested bail: सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शांतता कायम राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी घटक प्रमुखांना दिले आहेत.

सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शांतता कायम राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. राणे यांनी सोमवारी  वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर शिवसैनिकांकडून रात्रीपासून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली होती. राणेंच्या वक्तव्याबद्दल नाशिकमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पथक नेमण्यात आले. त्याबाबतचे पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन निषेध करू लागले. भाजपच्या कार्यालयावर हल्ला होऊ लागल्यानंतर त्यांच्याकडून निषेध व्यक्त होऊ लागल्याने पोलिसांना दोन्हींकडील कार्यकर्त्यांना आवर घालताना सौम्य लाठीमार केला होता.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे आदेशnराणेंना अटक करण्यात आल्याने भाजपच्या नेते निषेध करू लागल्याने वातावरण आणखी चिघळू लागले, राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊ लागले.nत्यामुळे संजय पांडे व अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिस