शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

राणे-केसरकर एकाच मंचावर! शिवसेनेच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच, सिंधुदुर्गचे राजकारण बदलतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:31 IST

राज्यातील राजकारणापेक्षा जिल्ह्यातील राजकारण सतत बदलत असते. त्याचे मुख्य केंद्र नारायण राणे असतात.

मुंबई : कोकण आणि नारायण राणे हे समीकरण गेली अनेक वर्षे कायम आहे. परंतू, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत बंड पुकारल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलले होते. नारायण राणेंचे खासदार पूत्र यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर केसरकर आणि राणे यांच्यात कधीच पटले नाही. जिल्हा नियोजन बैठका असोत की राजकारण केसरकर आणि राणे पिता पुत्रांमध्ये वाकयुद्धे होत राहिली. परंतू आज सिंधुदुर्गच्या राजकारणात राणे पिता-पूत्र आणि केसरकर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले आहे.

राज्यातील राजकारणापेक्षा जिल्ह्यातील राजकारण सतत बदलत असते. त्याचे मुख्य केंद्र नारायण राणे असतात. नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा केसरकर राष्ट्रवादीत होते. यामुळे तेव्हा दोघांना जुळवून घ्यावे लागले होते. परंतू, नंतर केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि राणेंच्या मदतीला खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते. पवारांनी केसरकर यांच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होता. सावंतवाडीत पवार, राणे यांची संयुक्त सभा होती. परंतू, तिथे केसरकर आमदार असूनही गेले नाहीत आणि सर्व वातावरण फिरले. पुढे केसरकर शिवसेनेत गेले. 

केसरकर आणि राणे समर्थक यांच्यातील वाद कायम राहिला. पुढच्या विधानसभेला केसरकर निवडून आले आणि राणेंना शिवसेनेच्या वैभव नाईकांकडून पराभव पत्करावा लागला. केसरकर पालकमंत्री झाले तेव्हा देखील जिल्हा परिषदेतील बैठकांत राणे वि. केसरकर जुंपत होती. पुन्हा लोकसभा आली, विधानसभा आली. जिल्ह्याचे वातावरण बदलत राहिले. आता राणे भाजपात आहेत. तर केसरकर शिंदेंच्या सत्तांतरानंतर शिवसेनेत आहेत. 

यामुळे पुन्हा एकदा राज्याचेच नाही तर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण बदलले आहे. आज सावंतवाडीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. या मंचावर नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे देखील आहेत. महत्वाचे म्हणजे केसरकर आणि नारायण राणे यांच्या संवाद, स्मितहास्य झाल्याने जिल्ह्यातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना