शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या सचिवाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 07:14 IST

भागिदारी कंपनीत आर्थिक गुंतवणूक करावयास लावल्यानंतर करारानुसार सहकाऱ्यांनी व्यवहार न केल्याने झालेल्या आर्थिक कोंडीतूनच कंत्राटदार सुमोहन राममोहनराव कनगाला (६०, रा. नांदेड) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 नांदेड - भागिदारी कंपनीत आर्थिक गुंतवणूक करावयास लावल्यानंतर करारानुसार सहकाऱ्यांनी व्यवहार न केल्याने झालेल्या आर्थिक कोंडीतूनच कंत्राटदार सुमोहन राममोहनराव कनगाला (६०, रा. नांदेड) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुरुवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नांदेड चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे सचिव चंद्रकांत गव्हाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.शहरातील श्रीनगर भागातील सायन्स कॉलेज रोडवर असलेल्या विद्यानगर येथील ‘कनगुला व्हिला’ या अलिशान बंगल्यात महावितरणचे प्रसिद्ध कंत्राटदार सुमोहन कनगाला यांनी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. कनगाला यांच्याजवळ तीन पानी पत्र आढळून आले होते. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी चंद्रकांत गव्हाणे, बाला रेड्डी, विनोद रेड्डी आणि जितेंद्र गुप्ता या चौघांनी भागिदारी कंपनीत ३ कोटी ७५ लाख रुपये गुंतवायला सांगून भागिदारी कराराप्रमाणे व्यवहार न केल्याने कनगाला यांची कोंडी झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. यातील गव्हाणे यांनी ५० टक्के गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र करारानुसार तशी गुंतवणूक केली नाही. बाला रेड्डी व विनोद रेड्डी यांनी आयसीएसए या कंपनीतून कनगाला यांचे ८० लाख रुपये परत केले नाहीत तर जितेंद्र गुप्ता यांच्याकडूनही कनगाला यांना १ कोटी १६ लाख रुपये परत येणे बाकी होते. सदरील रक्कम जालना व नांदेड येथे आयपीडीएस प्रकल्पातून कनगाला यांना द्यावयाची होती. मात्र ही रक्कम मिळत नसल्याने तसेच गुंतवणूक करायला सांगणारे सहकारी कराराप्रमाणे व्यवहार करत नसल्याने मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळलेल्या कनगाला यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. कनगाला यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना होता. मात्र ते पिस्तूल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असत. बुधवारी नागपूरला जायचे असल्याचे घरच्यांना सांगून ते बँकेत गेले. बँकेतील लॉकरमधून रिव्हॉल्वर आणून त्यांनी स्वत:च्या घरी गोळी झाडून घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक काकडे हे करीत आहेत.तिघे फरारया प्रकरणी कनगाला यांचा भाऊ मुरलीमोहन राममोहन कनगाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चंद्रकांत गव्हाणे (६२, रा. नांदेड), बाला रेड्डी (५५, रा. हैदराबाद), विनोद रेड्डी (५०, रा. हैदराबाद) आणि जितेंद्र गुप्ता (५०, रा. भुवनेश्वर) या चौघांविरूद्ध कलम भादंवि ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील गव्हाणे यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने गव्हाणे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. त्यांंच्या अटकेसाठी पोलीस पथके हैदराबादकडे रवाना झाली आहेत.

टॅग्स :Arrestअटक