काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. आज दुपारी २ वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.