शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नाम संस्था; नव्हे चळवळ

By admin | Updated: August 29, 2016 03:41 IST

नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत

पुणे : नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी बीज रोपण केलेली नाम फाउंडेशन ही केवळ संस्था राहिलेली नसून महाराष्ट्रभर एक चळवळ म्हणून विस्तारत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.माहेर प्रतिष्ठानतर्फे कॉ. के. आर. पाटील व सुनंदा पाटील स्मृतीप्रीत्यर्थ नाम फाउंडेशनला कृष्णानंद पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. केसरीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनच्या परभणी विभागाचे समन्वयक कांतराव देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे, भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई, उद्योगपती विठ्ठल मणियार, एकनाथ पाटील, गुरुनाथ पंडित, मीना नाईक उपस्थित होते.माशेलकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र विद्या, कला, उद्योग, मूल्ये आदी क्षेत्रात पहिला असावा. पण महाराष्ट्रात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बघितले तर त्यातही महाराष्ट्र अव्वल आहे, हे चिंताजनक आहे. लोकमान्य टिळक शंभर वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी लढत होते. आज आपण सुराज्यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.’’धनराज साठे यांनी पालकत्व घेतलेल्या ५० पोतराजांच्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सिने कलाकार मिहीर सोनी, प्राजक्ता गायकवाड, पार्थ भालेराव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘जगणे हीच सुंदर कविता आहे. ग्लॅमर असलेल्या चित्रपट जगतातील लोक महागड्या वाहनांतून येतात. फोटो काढतात, सह्या देतात. हेच त्यांना सुंदर आयुष्य वाटते. पण येथे सामान्य चेहरे पाहिले, की आतून समाधान वाटते. काही अपंग मुलांना पालक आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण देत असतात, तेव्हा तेच पालक व शिक्षक मोठे समाजकार्य करत असतात. आज आपण राजकारण, व्यसन, जात, पंथ, रूप, यात अडकून पडलो आहोत. पण समाजाला पाण्याच्या क्रांतीचा, हरित क्रांतीची व स्नेहाच्या क्रांतीची गरज आहे. कांतराव देशमुख म्हणाले, ‘‘नाम फाउंडेशनला जोडल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझे सामाजिक काम पाहून नाना व मकरंद यांनी मला या कार्यात जोडून घेतले. मराठवाड्यात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेतून ५७० किमी लांबीचे ओढे, नाले खोदले. मराठवाड्यातील लेनी नावाचा एक ओहळ होता त्या ओहळाचे खोलीकरण केले. त्यामुळे ती ओहळ गावची जीवनदायीनी झाली. लोकांनी तिचे ‘नाम नदी’ असे नामकरण केले.’’