शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

नोकरीच्या नावाखाली तरुणांना गंडा

By admin | Updated: August 23, 2016 06:46 IST

वागळे इस्टेट येथील पीसी टेक्नॉलॉजी कंपनीने सुमारे सहा ते सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठाणे : नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरूपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील अडीच ते तीन हजार तरुणांची वागळे इस्टेट येथील पीसी टेक्नॉलॉजी कंपनीने सुमारे सहा ते सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. कामगारांना एक आठवड्याची सुटी देऊन त्यांना गाफील ठेवून या कंपनीचे यश सिंग, छाया सिंग आणि पंकजकुमार हे तिघे संचालक अचानक पसार झाले. मेंटनन्स, वीजबिल, भाडे असे सर्वच पैसे थकवल्यामुळे गाळामालकाने कंपनीला सील ठोकल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर शेकडो तरुणांनी सोमवारी वागळे पोलीस ठाण्यात धडक देत तक्रार दाखल केली. प्रशिक्षणानंतर कोणीही कंपनी सोडली, तर प्रशिक्षणाचा खर्च वाया जाईल. त्यासाठी सुरक्षा अनामत रक्कम म्हणून २५ हजार रुपये घेण्यात येत असून वर्षभरानंतर ती परत करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्वांनी एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागल्याच्या आनंदात या कंपनीवर विश्वास ठेवला. परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने फरार संचालकांना शोधण्याची मागणी या सर्वच तरुणांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली आहे. डेहराडून (उत्तराखंड) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या ठाण्यासह पुणे, विशाखापट्टणम, कोलकाता या ठिकाणी शाखा होत्या. सर्वच शाखा अचानक एकाच दिवशी बंद करून संचालक पसार झाल्याने चांगल्या कंपनीत नोकरीला लागल्याचे समाधान अल्पावधीतच भंगल्याने अनेक तरुण आणि त्यांच्या पालकांच्या पायाखालची माती सरकली. जानेवारी २०१६ मध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई या परिसरांतील अनेक तरुणांनी एका नामांकित वेबसाइटवर झळकलेल्या जाहिरातीला भुलून तसेच काहींना मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पीसी टेक्नॉलॉजी नोकरीसाठी संपर्क साधला. तेव्हा, २ ते ११ जानेवारी २०१६ या कालावधीत प्रत्येकाच्या तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेतल्या. पहिल्या फेरीत २५ प्रश्नांची अर्ध्या तासांची पर्यायी उत्तरे असलेली परीक्षा घेतली. दुसरी तांत्रिक फेरी, तर अखेरची एचआर विभागाशी संबंधित होती. याच फेरीत त्यांना नोकरी पक्की झाल्याचे सांगून प्रशिक्षणासाठी २५ हजार रुपये धनाकर्षाने (डीडी) डेहराडून येथील कंपनीच्या बँक खात्यात भरण्याचे सांगण्यात आल्याचे घाटकोपर येथील तेजस भोर याने सांगितले. असाच अनुभव वडाळ्याच्या अंकिता खोत, ऐरोलीच्या सौरभ मांजरेकर यांना आला. एका चांगल्या ठिकाणी प्रोफेशनल प्रायव्हेट लि. कंपनी, प्रशिक्षणाचे पैसेही डीडीनेच भरल्यामुळे सर्वच सुशिक्षित बेरोजगारांचा विश्वास बसल्याचे मांजरेकर याने सांगितले. (प्रतिनिधी)>मालकाचा अपघात झाल्याची बतावणीकंपनीचा मालक यश राज याचा अपघात झाला असून तो रुग्णालयात आयसीयूत अत्यवस्थ अवस्थेत असल्याची बतावणी गेल्या काही दिवसांपासून अनेकांना केली जायची. त्यामुळे कोणीही पैशांची विचारणा करीत नव्हते. अनेकांना दिवसा प्रशिक्षण आणि रात्री बनावट प्रोजेक्टची नोकरी करण्यास भाग पाडले जात होते. अनेकांना १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर २५ हजार रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेतल्याचे आणि ती परत करणार असल्याचे लेखी दिल्यानेच अनेक जण यात अडकल्याची माहिती हितेन पाटील याने दिली. १३ ते २१ आॅगस्टदरम्यान कंपनीतील या कामगारांना सुटी दिली होती. २२ आॅगस्ट रोजी मात्र कंपनीला सील लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावीअशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास अशा तरुणतरुणींनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी केले आहे. >डेहराडूनच्या प्रशिक्षकाचीही फसवणूकया कंपनीत डेहराडून येथील सुमंत भटनागर यांच्यासह सहा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडूनही सुरुवातीला २० हजार रुपये घेतले. पुढे त्यांना १५ हजार रुपये वेतन दिले. नंतर, शेवटच्या दोन महिन्यांचे वेतनही मिळाले नसल्याचे भटनागर यांनी सांगितले. >ठाण्यातील ६०० तरुणांचा समावेशवागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्क, कासारवडवलीतील एम्बेसी पार्क अशा दोन ठिकाणी या कंपनीची कार्यालये आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून कंपनीत सुमारे ६०० मुले नोकरीला होती. या ठिकाणी नोकरीचे पत्र देऊन प्रशिक्षणासाठी प्रत्येकाकडून २५ हजार रुपये घेतले होते. ठाण्यातील ६०० तरुणांचा विचार केल्यास ही रक्कम दीड कोटीच्या घरात जाते. देशभरातील तरुणांकडून अडीच ते तीन हजार तरुणांकडून सुमारे साडेसहा ते सात कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती अनेक तरुणांनी दिली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर अधिक तपास करीत आहेत.