शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दाउद, छोटा शकीलच्या नावे महिलेला धमकावणा-याला दिल्लीतून बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:34 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमचच्या नावाखाली मुंबईच्या व्यावसायिक महिलेला १ कोटीसाठी धमकावणा-याला दिल्लीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हरिकुमार यादव (३०) असे अटक आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमचच्या नावाखाली मुंबईच्या व्यावसायिक महिलेला १ कोटीसाठी धमकावणा-याला दिल्लीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हरिकुमार यादव (३०) असे अटक आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.यादव हा नवी दिल्लीच्या नगलोई विभागातील रहिवासी आहे. खार परिसरात तक्रारदार महिला राहण्यास असून त्यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आॅक्टोबर २०१७ पासून त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकावण्यास सुरुवात झाली होती. बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या जुबेर खानला मदत केली म्हणून त्यांना धमकावणे सुरू असल्याचा या महिलेचा आरोप आहे.  यादवने कराचीमधून बोलत असल्याचे सांगून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमच यांचा साथीदार असल्याचे सांगून त्याने १ कोटीची मागणी केली. महिलेच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पुढे तो तपासासाठी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. खंडणीविरोधी पथकाने कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा कॉल नवी दिल्लीतून आल्याचे लक्षात आले. त्यानुसार तपास पथकाने सोमवारी नवी दिल्लीतून यादवला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक