शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

नामदेवांची अभंगसंपदा

By admin | Updated: April 2, 2015 03:13 IST

सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण

सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण १२९६ नंतर पंजाबात प्रबोधनाची पताका रोवली. घुमान हे गाव त्यांनीच वसवले, असेही मानले जाते. शीखांच्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांच्या अनेक रचना आहेत. त्यांचे ६२ अभंग ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. नामदेवांचे अभंग मराठीत असले तरी ग्रंथसाहिबमध्ये ते पंजाबीमिश्रित मराठी, संस्कृत भाषांतरित आहेत. अन्य सहा गुरूंच्या रचनांबरोबर विविध भागांत समाविष्ट करण्यात आले आहेत. उत्कट भावभक्ती आणि उदात्त विचार असलेली अभंगगाथा नामदेवांनी हिंदीमध्येही शब्दबद्ध केल्याने ते सर्वांना प्रेरक ठरली आहे. ‘ग्रंथसाहिबा’तील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या 'शबद' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणाऱ्या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे.ईश्वराची महती अवर्णनीय आहे आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही सुरनर मुनिजनांच्या तत्त्वाचा पार लागलेला नाही, याचे स्पष्टीकरण देताना नामदेव म्हणतात-केते पच गये हैं, कोटी ब्रम्हा। सूरनर मुनिजन पार न पावै।।तजू अभिमान कर निरमल करमा। नामदेव के स्वामी अंतरयामा।अगम अगाध हे तुमरी महिमा।। छीपेके घरि जनमु दैला,गुरु उपदेसू भैला। संतनके परसादि, नामा हरि भेटुला।।ही रचना उघड उघड मराठी वळणाची आहेच; मला शिंपी कुळात जन्म मिळाला, नव्हे, तो ईश्वराने दिला; पण गुरुपदेश झाला आणि मी पावन झालो. जात-जमात, पंथ, प्रदेश यांच्या पलीकडे पोहोचलो. हे सारे संतसहवासातून घडले. (भावार्थ)‘नामदेव देके गुरु शिखावे खेचरी मुद्रा गाई,प्रणवत नामा परम ततरे, सतिगुरू निकटी बताईला,खेचर भुचर तुलसी माला, गुरु प्रसादी पाइआ।।प्रभूची महती असामान्य आहे, असे सांगत सदगुरूविषयींचा पूज्यभाव नामदेवांनी या अभंगातून मांडला आहे. (लेखक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत.)