शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 12:58 IST

तिसऱ्या दिवशी सुद्धा भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी लावून धरली.

नागपूर: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशीही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होताना पाहायला मिळाले. 25  हजार रुपये हेक्टरी भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’ अशा घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप आमदारांनी टीका केली.

विधानसभेत मंगळवारी भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तर ‘सामना’तील बातमीचं पोस्टर सुद्धा भाजपच्या आमदारांकडून विधानसभेत झळकवण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले व त्यातून धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचे सुद्धा समोर आले होते.

तर आज तिसऱ्या दिवशी सुद्धा भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी लावून धरली. तर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत भाजप आमदारांनी विधीमंडळाचं कामकाज रोखून धरण्याचा पवित्रा घेतला. हेक्टरी 25 हजारांची मदत झालीच पाहिजे, दिलेला शब्द पूर्ण करा, अशा मागण्याची घोषणाबाजी भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केली.

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणीसुद्धा यावेळी भाजप आमदारांनी केली.