शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ प्रमाणे होणार ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस-वे’ , उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 12:28 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे.

नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विकसित होऊन विदर्भ व मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे केली.  नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (नरेडको) विदर्भ चॅप्टरच्यावतीने आयोजित ‘प्राइड ऑफ लँड अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना विविध गटांतील उपलब्धीसाठी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, नागपूर शहर लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा येथे पुढील काळात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठे शहर आठ ते दहा तासांत नागपूरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे नागपुरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किमीचे ‘एक्स्प्रेस’ महामार्ग तयार करण्याचे सूतोवाच केले आहे. हैदराबाद, दिल्लीकरिता नवीन मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात लॉजिस्टिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील सर्वांत मोठा इकॉनॉमिकल कॉरिडॉर म्हणून विकसित होणार आहे. त्याच धर्तीवर आता नागपूर ते गोवा महामार्गाचा विचार केला जात आहे. 

फायलींवर बसणारे सरकार नाहीराज्यातील नवीन सरकार फायलींवर बसणारे नव्हे, तर वेगाने निर्णय घेणारे आहे. सरकारकडे केवळ दोन वर्षे आहेत. अशा स्थितीत २०-२० सामना खेळायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांची खैर नाहीपाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांनी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, राज्य असो वा देश, कुठेही पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्यांना सोडणार नाही. कुठेही लपून बसले तरीही त्यांना शोधून योग्य शिक्षा करूच.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र