ऑनलाइन लोकमतबीड, दि. 17 - अडीच महिने उलटून गेले तरी अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने परळी तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांनी थेट नागनाथालाच पाण्यात बुडवून साकडे घातले आहे. गंगेच्या पाण्याने भक्तांनी नागनाथाचे मंदिर भरून टाकत देवा, आता तरी धो-धो पाऊस पाड, अशी विनवणी केली. नागनाथाचे मंदिर गंगेच्या पाण्याने भरून टाकले की पाऊस चांगला पडतो, अशी प्राचीन काळापासूनची श्रध्दा या परिसरातील नागरिकांमध्ये आहे.बुधवारी या परिसरातील ग्रामस्थांनी परभणी जिल्ह्यातील सोन्ना येथे जावून दक्षिणेची गंगा म्हटल्या जाणाऱ्या गोदावरी नदीतून पाणी आणून मोठ्या भक्ती भावाने नागनाथाचे मंदिर या पाण्याने भरून टाकले. तीन वर्षापूर्वीही अशा प्रकारे पाण्याने मंदिर भाविकांनी भरले होते. रमेश आप्पा तोडकरी, बाबू महाराज, महादेव सोळंके, दीपक सोळंके, कपिल गोसावी, धनंजय मिसाळ, हरिहर स्वामी, रमेश सोळंके, पप्पू सोळंके, कृष्णा जोशी, राम आबा, जिजा सोळंके आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
पावसासाठी नागनाथ मंदिर भरले गंगेच्या पाण्याने !
By admin | Updated: August 17, 2016 21:53 IST