शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा - विश्वास उटगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:31 IST

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे.

कोल्हापूर : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.उटगी म्हणाले, नोटाबंदीने उद्ध्वस्त झालाच; पण त्याबरोबर उद्योग व्यवसायांना घरघर लागली. त्यातून अजूनही देश सावरलेला नाही, गेल्या तीन वर्षांत मागील ४५ वर्षांतील बेरोजगारीचा आकड्यांचा विक्रम मोडला आहे. चलनातून रद्द केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा चलन व्यवस्थेत ८६.४४ टक्के हिस्सा होता. सरकारच्या आदेशाप्रमाणे विहीत वेळेत ९९.३० टक्के जुने चलन परत आल्याचे केंद्र सरकार सांगते; पण देशातील जिल्हा मध्यवर्ती बॅँकांकडील ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्याच नाहीत. नेपाळ, भूतान या देशांतील भारतीय चलन तसेच असताना सरकार कोणते आकडे देशासमोर ठेवत आहे, असा सवाल उटगी यांनी केला.रिझर्व्ह बॅँकेने २०१५ ते २०१८ या चार वर्षांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये एकूण चलनाची प्रत्यक्ष आकडेवारी दिली आहे. ५०० रुपयांच्या नवीन नोटा छापल्या; पण त्यांचे प्रमाण जास्त असल्याचे रिझर्व्ह बॅँकच सांगते. मग या नोटा कोणाच्या परवानगीने छापल्या याचे उत्तर रिझर्व्ह बॅँकेने देशातील जनतेला दिले पाहिजे, असे आव्हान विश्वास उटगी यांनी दिले.रिझर्व्ह बॅँकेने दीड लाखकोटीच्या जादा चलनाबद्दल खुलासा करावा, अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने केली आहे. संसदेचे शेवटचे अधिवेशन सुरू आहे, यामध्ये संयुक्त संसदीय समिती स्थापन करून जादा चलनाची चौकशी करावी, अन्यथा येत्या आठवडाभरात न्यायालयीन लढाई सुरू केलीजाईल, असा इशारा त्यांनीदिला.‘जीडीपी’ची सर्वाधिक घसरणकेंद्र सरकार ‘जीडीपी’च्या आकडेवारीमध्ये गडबड करत आहे. पावणेदोन टक्के इतकी प्रचंड घसरण जीडीपीमध्ये झाली असून, हे अच्छे दिनाचे द्योतक म्हणायचे काय? असा सवालही उटगी यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर