शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

नदाल - फेरर भिडणार उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 3, 2014 00:21 IST

राफेल नदाल आणि डेव्हिड फेरर हे फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच यंदा एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत.

पॅरिस : गेल्या वर्षी अजिंक्यपदाच्या लढतीत एकमेकाविरुद्ध लढलेले राफेल नदाल आणि डेव्हिड फेरर हे फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच यंदा एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत. आठ वेळचा चॅम्पियन आणि अग्रमानांकित नदालने लाल मातीवरील आपली हुकूूमत कायम राखत सर्बीयाच्या बिगर मानांकित दुसान लाजोविचला आज, सोमवारी ६-१, ६-२, ६-१ असे उद्ध्वस्त करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अंतिम आठमध्ये स्पेनच्या नदालची त्याच्याच देशाच्या फेररशी लढत होणार आहे. फेररने दक्षिण आफ्रिकेच्या सहा फूट आठ इंच उंचीच्या केविन एंडरसनला ६-३, ६-३, ६-७, ६-१ असे हरविले. क्ले कोर्टचा बादशहा असलेल्या गेल्यावर्षी फेररला पराजित करून आठव्यांदा फ्रेंच ओपनचा किताब जिंकला होता; परंतु यावेळी उपांत्यपूर्व फेरीतच हे दोघे खेळाडू एकमेकांना आव्हान देणार आहेत. नदालने लाजोविचला पराभूत करून फ्रेंच ओपनमधील आपले विजयाचे रेकॉर्ड ६३-१ असे केले आहे. आजच्या सामन्यात नदालने पहिल्या सेटमध्ये ५-० अशी आघाडी घेतली होती, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याने फोरहॅण्ड विनर लगावून विजय मिळविला. शारापोव्हाही अंतिम आठमध्येतत्पूर्वी रविवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात गतउपविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या सॅमंथा तोसूर विरुद्ध सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वर्षातील दुसर्‍या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू पराभूत होत असताना शारापोव्हाने आपले गेले नऊ सामने जिंकत विजयी लय कायम ठेवली आहे. सातवी मानांकित शारापोव्हाने १९ वी मानांकित तोसूरला ३-६, ६-४, ६-० असे पराभूत केले. तोसूरने सामन्यात जबरदस्त सुरुवात करून ३-६ असा पहिला सेट जिंकला होता; परंतु त्यानंतर शारापोव्हाने आपला अनुभव पणाला लावून ५-४ अशी आघाडी घेतली. तथापि, तिसर्‍या सेटमध्येही ३-० अशी आघाडी घेत आपले वर्चस्व प्रस्तापित केले.उपांत्यपूर्व फेरीत शारापोव्हाचा मुकाबला स्पेनची बिगर मानांकित खेळाडू गरबाईन मुगरूजा हिच्याशी होईल. तिने चौथ्या फेरीत फ्रान्सच्या पालिन पारमेंटीयरला हरवून अंतिम आठमध्ये स्थान मिळविले आहे. महिला एकेरीच्या अन्य सामन्यांत १४ वी मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारो हिने क्रोएशियाच्या एजला टामजानोविचला ६-३, ६-३ असे सलग सेटमध्ये हरवून चौथ्या फेरीचा सामना जिंकला. जर्मनीच्या आंद्रीया पेत्कोविचने हॉलंडच्या कीकी बर्टंस्ला १-६, ६-२, ७-५ असे हरवून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. तोसूरने पहिल्या सेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली; परंतु नंतर मला प्रेक्षकांचे प्रोत्साहन लाभल्याने हा सामना जिंकता आला. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्याने मी आनंदीत आहे. यापुढेही माझी कामगिरी उंचावत राहील, अशी मला अपेक्षा आहे.मारीया शारापोव्हा,