शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नॅक मुल्यांकन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल

By admin | Published: February 22, 2017 10:01 PM

नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अक्रिडिटेशन कौंसिल (नॅक )तर्फे बुधवारी मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस ग्रेड मिळाला आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि.22 : नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अक्रिडिटेशन कौंसिल (नॅक )तर्फे बुधवारी मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस ग्रेड मिळाला आहे. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ग्रेड घेवून पुणे विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले असून विद्यापीठाचा क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अ‍ॅव्हरेज (सीजीपीए) 3.60 आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नॅक समितीने भेट दिली होती. विद्यापीठाच्या विद्यार्थी,अधिकारी व कर्मचा-यांनी नॅकसाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे विद्यापीठाला कोणता ग्रेड मिळणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली होती. अखेर बुधवारी सायंकाळी नॅकच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील महाविद्यालयांच्या मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या मुल्यांकनाचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे बीड,जळगाव, परभणी, मुंबई,रत्नागिरी आदी ठिकाणच्या महाविद्यालयांचे मुल्यांकनाचे निकालही जाहीर झाले आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे म्हणाले, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी,अधिकारी व कर्मचा-यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विद्यापीठाला हे यश मिळाले आहे.विद्यापीठाचा यापूर्वीचा सीजीपीए 3.1 होता. त्यात वाढ होऊन तो 3.60 पर्यंत गेला आहे. विद्यापीठाचा पाया भक्कम झाला असून विद्यापीठाला अधिक पुढे जाता येईल. नॅककडून मिळालेल्या ग्रेडमुळे आनंद होत आहे.विद्यापीठाचे माजी बीसीयुडी डॉ.व्ही.गायकवाड म्हणाले, राज्यात सर्वाधिक ग्रेड घेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल क्रमांकावर आले आहे. अध्ययन ,अध्यापन आणि संशोधनामध्ये विद्यापीठाने मोठी कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या नवनवीन उपक्रमांची ,परदेशी विद्यापीठ व औद्योकीक कंपन्यांशी असलेल्या करारांची दखल घेतली.त्यामुळे विद्यापीठाचा 3.60 सीजीपीएवर आला आहे.