शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरोधात नाभिक संघटना आक्रमक, 2 डिसेंबर रोजी राज्यभर करणार रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 16:20 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी  काढलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नाभिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला होता.

बुलडाणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी  काढलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नाभिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला होता. मात्र आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.

या बैठकीत नाभिक संघटनेने मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नाभिक समाज 2 डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तर  हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 13 डिसेंबर रोजी 11 हजार जण मुंडन करुन, केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत. त्याचबरोबर, शुक्रवारपासून मुख्यमंत्री ज्या ज्या कार्यक्रमात जातील, तिथे तिथे नाभिक समजाकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना ‘एक न्हावी चार-पाच गिऱ्हाईकांची‌ अर्धी-अर्धी हजामत करतो आणि त्यांना बसवून ठेवतो’, असं उदाहरण दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला जातो आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरीभाषणात दिलेल्या उदाहरणामुळे अनावधानाने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आघाडी सरकारच्या कामाचं स्वरूप सांगताना अगदी अनावधानाने एक उदाहरण दिलं. तसं उदाहरण देण्यामागे समाजाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, असं मुख्यमंत्र्यांनी नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष सुधीर उर्फ बंडू राऊत यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस