शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एन वॉर्डमध्ये रंगणार अटीतटीची लढत

By admin | Updated: November 4, 2016 01:51 IST

प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले, त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पाहावयास मिळत आहे.

टीम लोकमत,मुंबई- प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले, त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पाहावयास मिळत आहे. त्यात मेट्रोमुळे पश्चिम उपनगरला जोडल्या गेलेल्या या परिसरात विकासाचा मुद्दा उमेदवारांच्या अजेंडावर असणार आहे. यावरच भाजपाचे उमेदवार अन्य पक्षांना तोंड देत, जोमाने तयारीला लागलेले दिसून येत आहे. 

विक्रोळीत ज्या ठिकाणी एस वॉर्डची सीमा संपते, तेथून एन वॉर्ड हा घाटकोपर पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. यामध्ये विक्रोळी पार्क साईट, भटवाडीसारखे डोंगराळ परिसर आहेत. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई नगर परिसरात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. एन वॉर्डमध्ये गुजराती, तसेच मराठी भाषिक पट्टा आहे. एन वॉर्डमध्ये पूर्वी १२ प्रभाग होते. मात्र, त्यातून एक प्रभाग कमी होत, ते ११ प्रभाग झाले आहेत. त्यातील सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत, तर उर्वरित प्रभागांपैकी ४ खुले तर १ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांबरोबरच सीमा आणि आरक्षण बदलल्याने उमेदवारांची पायपीट वाढली आहे. एन वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष हारुन खान यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची पत्नी बॅनरवर झळकताना दिसते आहे, तसेच या भागात भाजपाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे यावर पकड बसविण्यासाठी त्यांनी जोमाने तयारी आहे.>घाटकोपरमध्ये मेट्रो पश्चिम उपनगरांना जोडली गेल्याने या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टर वाढत आहे, तसेच या भागात व्यापारी संकुलही अधिक आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. मात्र, डोंगराळ परिसरातील पाण्याचा प्रश्न, तसेच एलबीएसच्या चिंचोळ्या भागामुळे होत असलेली कोंडी, असे मूलभूत प्रश्नदेखील सोडविण्यात येथील नेत्यांना यश आलेले नाही. त्यामुळे मूलभूत प्रश्न सोडविताना नाकीनऊ आलेले उमेदवार कशा पद्धतीने मतदारांची मते जिंकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. >एन वॉर्डमध्ये पूर्वी १२ प्रभाग होते. मात्र, त्यातून एक प्रभाग कमी होत ते ११ प्रभाग झाले आहेत. त्यातील सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत, तर उर्वरित प्रभागांपैकी ४ खुले तर १ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांबरोबरच सीमा आणि आरक्षण बदलल्याने, या ठिकाणी उमेदवारांची पायपीट वाढलेली दिसून येते. >२०१२ तील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते११७डॉ. भारती सुबोध भावदाने (सेना) ११३७७ दामिनी दत्तात्रय बसणकर (मनसे) ६४१६११८हारुन युसूफ खान (राष्ट्रवादी) ९५६७ गणेश अर्जुन चुक्कल (मनसे) ४५०३११९संजय भालेराव (मनसे) १०७६६सरस्वती गजानन भोसले (शिवसेना) ६६३०१२०प्रतीक्षा राजू घुगे(राष्ट्रवादी)७८२० निर्मला सुभाष पवार (शिवसेना) ७०२५१२१रितू राजेश तावडे (भाजपा)७०६९भारती बाबूराव मोरे( मनसे) ५८०६१२२ दीपकबाबा हांडे (अपक्ष) ८५५९ कोमल शिर्के साई नगरकर (सेना)६५३८१२३अश्विनी भरत मते (शिवसेना) ९०५०मोहम्मद सलीम मणियार (समाजवादी) ६९८०१२४प्रवीण छेडा (काँग्रेस)- ८५५७भालचंद्र शिरसाट (भाजपा) - ७७४८१२५राखी जाधव (राष्ट्रवादी) -८६३९प्रीती जाधव (शिवसेना)- ६९६४१२६सुरेश आवळे (मनसे) - ४९०९राजेंद्र कांबळे (काँग्रेस) - ३०९५१२७फाल्गुनी दवे (भाजपा) - १२६३६हर्षा मेहता(काँग्रेस) - ५६९८१२८मंगल कदम(मनसे) - ७६७० शीला उबाळे ( राष्ट्रवादी)- ४१०६> प्रभाग क्रमांक - १२३आरक्षण - खुला (महिला)एकूण लोकसंख्या- ५३,५३३अनुसूचित जाती - ६,३३९अनुसूचित जमाती -५९८ व्याप्ती - हनुमाननगर, विक्रोळी पार्क साइट> प्रभाग क्रमांक - १२४आरक्षण- खुला (महिला)एकूण लोकसंख्या - ५६२०८अनुसूचित जाती - ४७४३अनुसूचित जमाती - ८९३व्याप्ती - वर्षानगर, पार्क साइट कॉलनी, फिरोजशहा गोदरेज कंपनी, सिटी मॉल> प्रभाग क्रमांक - १२५आरक्षण- खुला (महिला)एकूण लोकसंख्या - ५७९१५अनुसूचित जाती - ७७३५अनुसूचित जमाती - ९८७व्याप्ती - रमाबाई कॉलनी, गोदरेज कंपनी, संभाजी पार्क, गोदरेज कॉलनी, व्रिकोळी व्हिलेज > प्रभाग क्रमांक - १२६आरक्षण-इतर मागासवर्ग (महिला) एकूण लोकसंख्या - ५७,९९०अनुसूचित जाती - ३,२८१अनुसूचित जमाती - ६५३व्याप्ती- जगडुशानगर, इंदिरानगर, साईनाथनगर, नित्यानंदनगर, दामोदर पार्क, नाबार्ड कॉलनी> प्रभाग क्रमांक - १२७आरक्षण- खुलाएकूण लोकसंख्या - ५२,५२१अनुसूचित जाती - ३,७९७अनुसूचित जमाती - ७३९व्याप्ती - रामनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर, काजरोळकर सोसायटी> प्रभाग क्रमांक- १२८आरक्षण- खुला (महिला)एकूण लोकसंख्या- ५३८६६अनुसूचित जाती - २३८८अनुसूचित जमाती -५३२व्याप्ती - बर्वेनगर, काजुपाडा, गांधीनगर, न्यू दयासागर, मानेकलाल इस्टेट> प्रभाग क्रमांक - १२९आरक्षण- इतर मागासवर्गएकूण लोकसंख्या - ५५६४०अनुसूचित जाती - २४५४अनुसूचित जमाती - २८६व्याप्ती - चिराग नगर, आझादनगर, मानेकलाल इस्टेट(‘एन’ व ‘एस’ विभगाची सामाईक सीमा व विक्रोळी पार्क साइट> प्रभाग क्रमांक - १३०आरक्षण- खुला (महिला)एकूण लोकसंख्या - ५३,९४७अनुसूचित जाती - ३४९६अनुसूचित जमाती - ४४२व्याप्ती - किरोल व्हिलेज, टी.पी.एस. कॉलनी, नेव्हल स्टोअर्स, कपोल वाडी> प्रभाग क्रमांक - १३१आरक्षण- खुलाएकूण लोकसंख्या - ६१,८८२अनुसूचित जाती - ३,३८६अनुसूचित जमाती - ७०३ व्याप्ती - नायडू कॉलनी, म्हाडा कॉलनी, साईबाबानगर, सावित्रीबाई फुलेनगर> प्रभाग क्रमांक - १३२ आरक्षण- खुलाएकूण लोकसंख्या - ६२९९२अनुसूचित जाती - ४००३ अनुसूचित जमाती - ५१० व्याप्ती - सोमय्या कॉलेज, ओ.एन. जी. सी. कॉलनी, गरोडीयानगर, राजावडी रुग्णालय> प्रभाग क्रमांक - १३३आरक्षण- खुलाएकूण लोकसंख्या - ५९,९५०अनुसूचित जाती - ९,९३३ अनुसूचित जमाती - ५१८व्याप्ती - कामराजनगर, रमाबाई आंबेडकर नगर