शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 22:50 IST

तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा, मी सर्वप्रथ धार्मिकस्थळं पूर्ण केली. यात, राम वन गमन यात्रा, हा ८ हजार कोटींचा मार्ग ५५ टक्के पूर्ण झाला. राम-जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय तो ४७ टक्के पूर्ण झालाय. अयोध्येच्या रिंग रोडचेकाम सुरू झाले आणि बौद्ध सर्किट म्हणून मी सिमेंटचा २२ हजार कोटीरुपयांचा मार्गही मी पूर्ण केला. अशा अनेक कामांची माहती यावेळी गडकरी यांनी दिली...

मी जवळपास १० लाख कोटी रुपयांचे द्रुतगती महामार्ग बांधत आहे.  त्यांची संख्या ५७ आहे. आधी जसे राष्ट्रीय महामार्ग होते, तसे आता अॅक्सीस-कंट्रोल एक्सप्रेस महामार्ग आहेत. त्यामुळे आपल्याला रोडवर अडचणी येणार नाहीत. तसेच, आम्ही ४६० किलोमिटरचे अडीच लाख कोटी रुपयांचे १७८ टनेल्स बांधण्यासाठी घेतले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. ते दादर येथील अमर हिंद मंडळच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेत बोलत होते. गेल्या काही वर्षांत देशातील पायाभूत सुविधा आणि दळवळणासंदर्भात झालेल्या विकास कामांसंदर्भात ते बोलत होते. यावेळी त्यांनी, आपल्या आईने इच्छा व्यक्त केलेल्या एका रस्त्यासंदर्भातही माहिती दिली. गडकरी म्हणाले, "एक महत्वाचे म्हणजे, माझी आई मृत्यूपूर्वी, गाणगापूरला गेली होती. ती मला म्हणाली होती की, नितीन एवढा रस्ता खराब आहे रे. माझी पाठ खिळखिळी झालीय. आता मला नाही वाटत, मी पुढच्या वेळी जाऊ शकेल. पण तुला करता आलं, तर एक काम कधी कर, हा रस्ता चांगला करत. तेव्हापासून माझ्या मनात हे रुतलेलं होतं की, आपण हे करायला हवे आणि म्हणून मी आज दीड लाख कोटी रुपये... आता तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा. पालखी मार्ग १२ हजार कोटी रुपयांचा आपण बांधून पूर्ण केला. तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा, मी सर्वप्रथ धार्मिकस्थळं पूर्ण केली. यात, राम वन गमन यात्रा, हा ८ हजार कोटींचा मार्ग ५५ टक्के पूर्ण झाला. राम-जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय तो ४७ टक्के पूर्ण झालाय. अयोध्येच्या रिंग रोडचेकाम सुरू झाले आणि बौद्ध सर्किट म्हणून मी सिमेंटचा २२ हजार कोटीरुपयांचा मार्गही मी पूर्ण केला. अशा अनेक कामांची माहती यावेळी गडकरी यांनी दिली...एक घटना सांगताना गडकरी म्हणाले, "एक योगायोग घडला, जगातील सर्व बौद्ध भिक्षू बोधगयेला एकत्रित आले होते. ते माझ्या मागे लागले की, तुम्ही काही करा पण याला या. मी तेथे गेलो आणि भगवान गौतम बुद्धांचे ज्या ठिकाणी देहावसान झाले, तेथे दर्शन घेतले. तेथे त्यांचा एक बोधी वृक्ष होता. ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. मी आणि माझी पत्नी बरोबर होतो. वादळ अथवा हवा नव्हती. तेवढ्यात त्या बोधी वृक्षाचे एक पान खाली पडले. ते माझ्या खांद्याला लागून माझ्या पत्नीच्या अंगावर पडले. त्या ठिकाणी हाँगकाँग, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, चायना येथील बौद्ध भिक्षू होते. त्या सर्वांनी बौद्धांची प्रार्थना करून त्यांनी  मला आशिर्वाद दिला. त्यांना या प्रकल्पाचा प्रचंड आनंद झाला. आज जगातील मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मिय आज बौधगयेला येतात. यामुळे धार्मिक पर्यटन वाढले आहे." याशिवाय त्यांनी, "चार धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमनोत्री रस्ता (८२५ किलोमीटर, साडेपाच हजार कोटी.) ९०% पूर्ण झाला आहे. आता तो सुप्रीम कोर्टाच्या मॉनिटरिंग कमिटीच्या क्लिअरन्समध्ये अडकला आहे. आम्ही केदारनाथमध्ये ३६० रोपवे बांधत आहे.  हवेत चालणाऱ्या डबल डेकर बसवर काम करतोय." आदी माहितीही यावेळी गडकरी यांनी दिली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाroad transportरस्ते वाहतूक