शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

माझे मंत्रिपद कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे..!

By admin | Updated: May 4, 2017 23:27 IST

सदाभाऊंचा टोला; चळवळीमुळेच मिळाली सत्ता

कोल्हापूर : हा सदाभाऊ चळवळीच्या मुशीतून तयार झालेला नेता आहे. ओठांवर मिशी फुटली नव्हती तेव्हापासून चळवळीत आहे; परंतु मिशा फुटल्यावर चळवळीत आलेले काहीजण माझ्याबद्दल शंका घेत आहेत. मी शांत आहे याचा अर्थ कमजोर आहे असा नव्हे. या चळवळीने, तुम्ही शेतकऱ्यांनी मला घडवलं... तुम्हीच नेतृत्व दिलं आणि सत्तेत बसवलं. कुणाच्या मेहरबानीवर मला मंत्रिपद मिळालेले नाही, असा टोला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे लगावला. निमित्त होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या कर्जमुक्ती मोर्चाचे. सदाभाऊ या मोर्चाला येणार की नाही, याबद्दल मोठी उत्सुकता होती. ते मोर्चाला आले नाहीत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेला उपस्थित राहिले व आपल्या मनातील सल बोलून दाखविली. त्यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे शेट्टी व त्यांच्यातील दरी चांगलीच रुंदावली असल्याचेही दिसले.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी दसरा चौकातून दुपारी अडीच वाजता निघालेला हा मोर्चा सव्वातीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तिथे उपस्थित शेतकऱ्यांतही सदाभाऊ येणार का, हीच उत्सुकता होती. सदाभाऊ ४ वाजून १० मिनिटांनी तिथे आले. त्यावेळी टाळ्या व शिट्ट्यांचा पाऊस पडला. हौशी कार्यकर्त्यांनी या दोघांच्या हस्तांदोलनाचे क्षणही मोबाईलमध्ये टिपले. वृत्तपत्र छायाचित्रकारांचीही गर्दी उसळली. रविकांत तूपकर यांनी सदाभाऊंना जागा करून दिली. शेट्टी यांनी हसून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ‘सदाभाऊ... सदाभाऊ, धुमधडाका’ अशा घोषणा काहींनी दिल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद नव्हता.सदाभाऊ म्हणाले, ‘आज या मोर्चाला येताना मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्यांना शेतकरी खवळला असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्याला १०० टक्के कर्जमुक्त करायचे आहे, त्याबद्दल शंका बाळगू नका, असे सांगितले आहे. ते करताना ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांचाही विचार आम्ही करणार आहोत. चळवळीपासून मी जराही बाजूला गेलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जीव ओवाळून टाकण्याची माझी तयारी आहे. मी काय व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून तयार झालेला नेता नाही. काळी माती कपाळाला लावून येरवडा जेलमध्ये गेलो म्हणून नेता झालो, हे कुणी विसरु नये. राजाची कपडे घालून सिंहासनावर बसणारा बेगडी राजा मी नव्हे. मी रणांगणात लढणारा शिपाई आहे आणि कधी तलवार काढायची याचेही ज्ञान मला आहे.’मी सरकारमध्ये शेतकरी व स्वाभिमानी संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच सत्तेत असल्याचे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांची चळवळ मला नवीन नाही. गेली तीस वर्षे अनेक प्रश्नांसाठी मी राजू शेट्टी यांच्यासोबत लढलो आहे. त्यासाठी लाठ्या झेलल्या, तुरुंगात गेलो. अनेकांचा रोष पत्करला; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बांधीलकी सोडली नाही. आज सरकारमध्ये असतानाही शेतकऱ्यांचेच प्रश्न सोडविण्याचे काम मी प्रामाणिकपणे करीत आहे. विरोधी पक्षांच्या ध्यानीमनी नव्हते तेव्हा आम्ही तुळजापूरमध्ये जाऊन सातबारा कोरा करण्याच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.’