शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 10:32 IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच, १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, राज ठाकरे यांनी ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे. "माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा", अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप सुद्धा शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे यांनी जुन्या भाषणातून महाराष्ट्राबद्दल जे मनोगत व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून जेव्हा मनसेची स्थापना केली. त्यावेळी मी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण करीत आहे, असे म्हटले होते. तेच वाक्य या शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. तसेच, या ऑडिओ क्लिपमध्ये संयुक्त महाराष्ट्राबाबत राज ठाकरे यांनी मांडलेले काही प्रमुख मुद्देही आहे. याशिवाय, संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ हे राज ठाकरे यांच्या भाषणातील वाक्य देखील ऑडिओ क्लिपमध्ये आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त इंस्टाग्रामवर रील देखील बनवले आहे. यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचे हे रिल सोशल मीडियावर हे रिल तुफान व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी रिल स्टार अथर्व सुदामेसोबत महाराष्ट्र दिनानिमित्त खास व्हिडीओ बनवला आहे. या रिलमधून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचं महत्व आणि मराठी भाषा संवर्धनाविषयी भाष्य केले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र