शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल, असा आशिर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.

ठळक मुद्देमाझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वादराजू शेट्टींची शिरोळ येथील निवासस्थानी घेतली भेट

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल, असा आशिर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.

लोकमतला मंगळवारी जेव्हा धैर्यशील माने यांनी भेट दिली, त्यावेळीच त्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणे त्यांनी बुधवारी सकाळीच शिरोळ येथील शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.ज्यांच्या विरोधात लढले, त्यांच्याच घरी जाऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका वेगळ्या परंपरेचा पायंडा या मतदारसंघात पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नेत्यांमध्ये टोकाची इर्ष्या पाहायला मिळाली असताना विरोधकाच्या घरी जाउन प्रतिस्पर्ध्यांची भेट घेत एक वेगळाच संदेश माने यांनी दिला आहे. धैर्यशील माने सुद्धा माझ्या नातवासारखे आहेत, जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा, असा आशीर्वाद शेट्टींच्या आईंनी माने यांना दिला.तुम्हाला भेटायला म्हणून मी खास आलोय, असे माने राजू शेट्टी यांच्या आईचे पाया पडून आशिर्वाद घेताना म्हणाले. आशिर्वाद माझा भरपूर आहे, माझा मुलगा जसा केला, तसे कर, माझा आशिर्वाद मोठा आहे, असा आशिर्वाद त्यांनी दिला. तुमच्या आशिर्वादाने सगळेच चांगले होतेय, तुमचा आशिर्वाद असल्यावर काही कमी पडणार नाही, असे माने यांनी सांगितले.

यावेळी शेट्टी यांनीही माने यांना लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडावेत असा सल्ला दिला. माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला, जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.यावेळी फेटा बांधून पुष्पगुच्छ देत राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने यांचा सत्कार केला. राजू शेट्टी यांच्या घरात यावेळी माने यांचे औक्षणही केले. या भेटीप्रसंगी धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि राजू शेट्टी यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीhatkanangle-pcहातकणंगलेkolhapurकोल्हापूर