शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी प्रकरण- माझ्या छकुलीला न्याय मिळाला, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 12:36 IST

कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील तिघाही दोषींना कोर्टाने बुधवारी सकाळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा सुनावल्यावर निर्भयाच्या आईला कोर्टात अश्रू अनावर झाले.

अहमदनगर- कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील तिघाही दोषींना कोर्टाने बुधवारी सकाळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा सुनावल्यावर निर्भयाच्या आईला कोर्टात अश्रू अनावर झाले. माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावूक प्रतिक्रिया निकालानंतर निर्भायाच्या आईने दिली. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर विश्वास होता. पोलीस विभागाने त्यांच्या तपासातून छकुलीला न्याय मिळवून दिला आहे, असंही निर्भयाच्या आईने पुढे म्हंटलं. मी शेवटपर्यंत लढणार, कोणत्याही छकुलीसाठी असाच लढा देणार, असं भावनिक मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली. 'मराठी समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी खूप साथ दिली. मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाजांचे, महाराष्ट्राचे मी आभार मानते,” असं निर्भयाची आई म्हणाली.

'प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते,' असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हते.सर्व दोषींना फाशीची शिक्षा मिळाली असली तरी ते निकालाविरुद्ध हायकोर्टात दाद मागू शकतात. याविषयी विचारलं असता निर्भयाची आई म्हणाली की, “पहिली लढाई जिंकली आहे. पण न्यायासाठी आणि दोषींना फासावर लटकवण्याठी शेवटपर्यंत लढा देणार. यापुढे कोणत्याही छकुलीवर अत्याचार झाल्यास मी धावून जाईन, असंही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालयAhmednagarअहमदनगर